AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजाराची अशी राहिल चाल, या गोष्टींचा दिसेल परिणाम, पटकन टाका एक नजर

Share Market : गुंतवणुकीपूर्वी बाजाराची जाणून घ्या चाल, काय म्हणतात तज्ज्ञ

Share Market : शेअर बाजाराची अशी राहिल चाल, या गोष्टींचा दिसेल परिणाम, पटकन टाका एक नजर
कशी राहिल चाल
| Updated on: Jan 13, 2023 | 9:25 AM
Share

नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणुकीपू्र्वी बाजाराची दिशा एकदा समजून घ्या. आंधळी कोशिंबीर खेळण्यापूर्वी बाजारावर कोणत्या घटकांचा परिणाम दिसून येणार हे माहिती असल्यास निदान नुकसान तरी टळते. रिसर्च अॅनालिस्ट गौरव शर्मा यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आज निफ्टी (Nifty), बँक निफ्टी (Bank Nifty)आणि निफ्टी आयटी कसा व्यापार करतात, यावर तुम्हाला कमाईचे गणित मांडता येईल. त्यासाठी त्यांनी हे पाच पॉईंट्स सांगितले आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम ट्रेडिंग सत्रात गुंतवणुकीसाठी या टिप्स महत्वाच्या ठरु शकतात.

एचसीएल टेक (HCL Tech) कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगला फायदा मिळवून दिला. तिसऱ्या तिमाहीत या कंपनीचा नफा 19 टक्क्यांनी वाढून 4,096 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी सारख्या तिमाहीत कंपनीने 3,442 कोटींचा नफा कमावला होता.

गुंतवणूकदारांसाठी एचसीएल टेक कंपनीने 1 फेब्रुवारीपर्यंत लाभांभ देण्याची घोषणा केली आहे. इन्फोसिस कंपनीची घोडदौडही जोरदार आहे. आयटी सेक्टरमध्ये ही कंपनी मजबूत स्थितीत दिसून येत आहे. हा केवळ अंदाज आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही.

डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दरात घसरण दिसून आली. गुरुवारी याविषयीची आकडेवारी सरकारने जाहीर केली आहे. आकड्यानुसार, डिसेंबर 2022 मध्ये महागाई दर (CPI Inflation) 5.72 राहिला. यामुळे सलग तीन महिन्यात महागाईच्या आघाडीवर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यान्न आणि खाद्य पदार्थांचे भाव घसरल्याने किरकोळ महागाई दरात घसरण झाली.

ग्राहक किंमत निर्देशांकावर (CPI) आधारीत किरकोळ महागाई नोव्हेंबर 2022 मध्ये 5.88 टक्के आणि गेल्या वर्षी डिसेंबर 2021 मध्ये 5.66 टक्के होती. दोन वर्षांपूर्वीच्या आकड्यांवर नजर टाकली असता हे आकडे दिलासा देणारे ठरले आहेत.

अमेरिकेत महागाई दर कमी झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमधील महागाईचा आकडा घसरला आहे. महागाई दर आता 6.5 टक्क्यांवर पोहचला आहे. येत्या काही दिवसांत हा दर अजून घसरण्याची अपेक्षा आहे.

अमेरिकेची अर्थव्यवस्था महागाईच्या मगरमिठ्ठीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घडामोडीचा परिमाम व्याजदरावर दिसून येईल. फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदराबाबतचे आक्रमक धोरण सोडणार, अशी अपेक्षा आहे. सहा महिन्यानंतर महागाईचा दर कमी झाला.

अमेरिकन शेअर बाजारात डाउ जोंसने 17 दिवसांचे ब्रेकआऊट दिले आहे. त्याने एका कपासारखे पॅटर्न तयार केले आहे. सध्या डाऊ जोंस 33697 ते 34189 या दरम्यान ट्रेंड करत आहे. महागाई कमी झाल्याचा परिणाम बाजारावर दिसून येईल.

भारतीय रुपया अमेरिकन डॉलरपेक्षा मजबूत स्थितीत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 81.115 वर व्यापार करत आहे. आज यामध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. व्यापार, व्यवहारासाठी, आंतरराष्ट्रीय चलन म्हणून भारतीय रुपयाला काही देशांनी मान्यता दिली आहे.

शेअर बाजारावर कोणत्या घटकांचा परिणाम होऊ शकतो, याचा हा आढावा आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टिप बिलकूल नाही. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....