AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाळीशीत आहात, अशी गुंतवणूक करा, 2 कोटी कमवा !

काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्ही चाळीशीनंतरही करोडपती होऊ शकता. पण कसे ? (SIP Investment After Late 40) 

चाळीशीत आहात, अशी गुंतवणूक करा, 2 कोटी कमवा !
| Updated on: Dec 12, 2020 | 11:27 AM
Share

मुंबई : पैसे कमवायचं तसं कुठलंच वय नसतं. तरूणपणी तुम्ही करोडपती होऊ शकता आणि अगदी चाळीशीनंतरही. खरं तर आपल्याकडे पैसा नाही, आणि आयुष्य पैशाच्या चाकांशिवाय चालू शकत नाही. चाळीशीत आपल्याकडे पैसे आहेत की नाही याची जाणीव प्रकर्षानं होत असते. अनेक जण तरूण वयात बचतीकडे दुर्लक्ष करतात. त्याची जाणीव त्यांना चाळीशीत होते आणि त्याला पहिला प्रश्न भेडसावतो तो आपण काहीच पैसे जमवले नसल्याचा. पण तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. कारण तुम्ही चाळीशीनंतरही करोडपती होऊ शकता. पण कसे ? (SIP Investment After Late 40)

एसआयपीनं काहीही शक्य 

सिस्टेमॅटीक इन्व्हिस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपी. मराठीतच सांगायचं तर नियोजनबद्ध गुंतवणूक. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचं कुठलंच वय नसतं. तुमचं वय चाळीस असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तरीही तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. त्यामुळे करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण गुंतवणूकीत शिस्त महत्वाची आहे हे लक्षात असू द्या.

पण नेमकी किती गुंतवणूक करावी लागेल?

तुमचं वय 41 वर्ष आहे आणि तुम्ही जर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला दर महिन्याला म्युच्युअल फंडात 9 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यावर तुम्हाला 10 ते 15 टक्के रिटर्न सहज मिळू शकतो. त्यातून रिटायरमेंटच्या आधी करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तुमच्याकडे 2 कोटी रूपये कमाईचे असू शकतात.

कसा आहे नेमका हिशेब?

म्युच्युअल फंडात 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न तर मिळतोच. पण काही फंड तर त्यापेक्षाही जास्त म्हणजे 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न देतात. दर महिन्याला तुम्ही 10 हजार गुंतवलात आणि त्यानं 20 टक्क्यांपर्यंत सीजीआर रिटर्न दिला तर रिटायरमेंटच्या आधी तुमच्याकडे 2 कोटी रुपये असतील. (SIP Investment After Late 40)

संबंधित बातम्या : 

चांगली बातमी! सरकारने 89 लाख करदात्यांच्या खात्यात पैसे केले जमा, जाणून घ्या

फक्त 250 रुपयांच्या गुंतवणुकीवर मुलीच्या भविष्याची चिंता सोडा, टॅक्स बचतीसोबत ‘हे’ आहे फायदे

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...