Sovereign Gold Bond | सरकाराने ठरवला सोन्याचा भाव, ऑनलाईन खरेदीवर इतकी सवलत

| Updated on: Feb 10, 2024 | 2:19 PM

Sovereign Gold Bond | भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी सुवर्ण रोखे योजना येत्या सोमवारपासून सुरु होत आहे. पाच दिवसांसाठी ही संधी आहे. या गोल्ड बाँडसाठी इश्यु प्राईस 6,263 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे. Sovereign Gold Bond योजना 2023-24 सीरीज-4 या महिन्यात 12 ते 16 फेब्रुवारीपर्यंत उघडी राहील.

Sovereign Gold Bond | सरकाराने ठरवला सोन्याचा भाव, ऑनलाईन खरेदीवर इतकी सवलत
Follow us on

नवी दिल्ली | 10 February 2024 : आर्थिक वर्ष 2023-24 च्या Sovereign Gold Bond योजनेची चौथी मालिका आली आहे. सोमवारपासून ग्राहकांना त्यात गुंतवणूक करता येईल. या महिन्यात 12 ते 16 फेब्रुवारी दरम्यान ग्राहकांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. या गोल्ड बाँडमध्ये हमखास परतावा मिळतो. तर ऑनलाईन गोल्ड बाँड खरेदी करणाऱ्यांना सवलत पण मिळते. डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना पण ही सुविधा मिळते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेचा (Sovereign Gold Bond Scheme) 2015 मध्ये श्रीगणेशा केला होता.

12 ते 16 फेब्रुवारीदरम्यान योजना

भारतीय रिझर्व्ह बँकेने सरकारी गोल्ड बाँड योजनेत (SGB) सोमवारसह पाच दिवसांत गुंतवणूक करता येईल. 16 फेब्रुवारीपर्यंत ही गुंतवणूक करता येईल. या रोखे योजनेची इश्यू प्राईस 6,263 रुपये प्रति ग्रॅम आहे. सरकारी गोल्ड बाँड स्कीम 2023-24 सीरीज-4 मध्ये गुंतवणुकीची संधी मिळत आहे. यापूर्वी या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर ज्यांनी सुरुवातीला गुंतवणूक केली. आठ वर्षानंतर त्यांना चांगला परतावा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

1 लाखावर 8 वर्षांत1.28 लाख कमाई

नोव्हेंबर 2015 मध्ये गोल्ड बाँडमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांना 30 नोव्हेंबर 2023 रोजी जवळपास 2.28 लाख रुपयांचा परतावा मिळाला. 8 वर्षांत गुंतवणूकदारांना जवळपास 1.28 लाख रुपयांचा नफा झाला. विशेष म्हणजे ग्राहकाला सोने खरेदी करण्याचे वा ते सांभाळण्याची चिंता या योजनेत नाही. या मालिकेतील गोल्ड बाँडवर सप्टेंबर 2016 नंतर व्याजदर घटले आहे. ग्राहकाला पूर्वी 2.75 टक्क्यांनी व्याज मिळत होते. आता 2.5 टक्के दराने व्याज मिळाले.

6,263 रुपये प्रति ग्रॅम भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,624 रुपये आहे. तर आरबीआयने ग्राहकांसाठी या योजनेत 62,630 रुपये प्रति दहा ग्रॅम असा, 6,263 रुपये प्रति ग्रॅम भाव ठरवला आहे. 10 ग्रॅम सोन्यासाठी 62,630 रुपये मोजावे लागतील. डिजिटल पेमेंट केले तर गुंतवणूकदारांना 50 रुपये प्रति ग्रॅमची सवलत मिळेल. सोन्याचा भाव 6,213 रुपये प्रति ग्रॅम असेल. आरबीआयचा गोल्ड बाँड हा 24 कॅरेट सोन्याच्या किंमती इतका असतो.