Share Market | गुंतवणूकदारांच्या भाळी लक्ष्मीचा टिळा! Sensex यंदाच 86,000 अंकांच्या घरात

Share Market | नवीन वर्षातील 40 दिवसात BSE चे मार्केट कॅप, गुंतवणूकदारांच्या कमाईत 22 लाख कोटींची वाढ दिसून आली. तर गेल्या वर्षाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास बीएसई मार्केट कॅप 3,64,28,846.25 कोटी रुपये होते. ते वाढून आता 3,86,36,302.43 कोटी रुपये झाले आहे. यंदाच बीएसई मोठी कमाल करणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Share Market | गुंतवणूकदारांच्या भाळी लक्ष्मीचा टिळा! Sensex यंदाच 86,000 अंकांच्या घरात
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 9:27 AM

नवी दिल्ली | 10 February 2024 : भारतीय अर्थव्यवस्थेने मोठी मुसंडी मारली आहे. इतर अर्थव्यवस्थांपेक्षा दमदार कामगिरी केली आहे. देशातील शेअर बाजारावर त्याचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. बाजारातील शेअर रॉकेटसारखे सूसाट सुटले आहेत. सध्या चीनचा शेअर बाजार मोठ्या दिव्यातून जात आहे. जपानचा शेअर बाजार पण धावत आहे. आता अमेरिकेतील एका अहवालानुसार, भारतीय शेअर बाजार अजून एक मोठा पल्ला गाठणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय शेअर बाजार 86 हजार अंकांचा टप्पा ओलांडणार असा दावा करण्यात येत आहे. सध्या सेन्सेक्स 71,595 अंकावर आहे. बीएसई निर्देशांक 15 हजार अंकांची झेप घेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

प्रत्येक मिनिटाला 18 कोटींची कमाई

पुढील 300 दिवसांत शेअर बाजारातील जवळपास 16 कोटी गुंतवणूकदारांना प्रत्येक मिनिटाला जवळपास 18 कोटी रुपयांची कमाई होईल, असा दावा करण्यात येत आहे. मॉर्गन स्टेनलीचे जोनाथन गार्नर यांनी हा दावा केला आहे. वार्षिक आधारावर बीएसई मार्केट कॅपमध्ये जवळपास 100 लाख कोटी रुपयांची वाढ दिसून आली. गेल्या 40 दिवसांमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 22 लाख कोटी रुपयांचा फायदा दिसून आला आहे.

हे सुद्धा वाचा

वर्षाच्या अखेरीस 86000 अंकांचा गाठणार टप्पा

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने धावत आहे. आर्थिक दरवाढीने उत्साह संचारला आहे. कंपन्यांचे तिमाही निकालाचे आकडे पण दिलासादायक आहेत. या कंपन्या देशाच्या विकासात मोठी भर घालत आहेत. खासगीच नाही तर सरकारी कंपन्या पण तेजीत आहेत. त्याचा अनुकूल परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 86 हजार अंकांचा टप्पा गाठणार अथवा त्यापुढे धाव घेण्याचा दावा मॉर्गन स्टेनलीने केला आहे. पुढील 300 दिवसांत सेन्सेक्समध्ये 20 टक्क्यांची वाढ दिसून आली. गेल्या 40 दिवसांत सेन्सेक्समध्ये 0.90 टक्क्यांची घसरण दिसून आली.

पुढील 300 दिवसांची स्थिती

  • सेन्सेक्स 86000 अंकांवर पोहचणार
  • 300 दिवसांत बीएसई मार्केट कॅप 464 लाख कोटींच्या घरात
  • सध्या बीएसई मार्केट कॅपमध्ये 77,73,352.82 कोटींची वाढ
  • यंदा बीएसईच्या बाजार भांडवलात 100 लाख कोटींची वाढ
  • चीन, जपान, हाँगकाँग, दक्षिण कोरीयाच्या बाजार इतकी मोठी झेप घेण्याची शक्यता कमी
Non Stop LIVE Update
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.