UPI पेमेंटवर लवकरच ‘Make In India’ ची मोहोर! Paytm नंतर Google Pay, Phone Pay पण सलाईनवर?

UPI Payments | Paytm चे कारनामे भारतीय रिझर्व्ह बँकेने समोर आणले. सरकार यामुळे अलर्ट झाले आहे. भारतीय ॲपवर अधिक जोर देण्यात येत आहे. BHIM UPI हे असेच एक ॲप आहे. तुम्हाला या माध्यमातून पण पेमेंट करता येऊ शकते. केंद्र सरकारच्या धोरणांचा अंदाज आल्याने गुगलपे, फोनपे पण गॅसवर आहेत. तर ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

UPI पेमेंटवर लवकरच 'Make In India' ची मोहोर! Paytm नंतर Google Pay, Phone Pay पण सलाईनवर?
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 10:39 AM

नवी दिल्ली | 10 February 2024 : Paytm Payment Bank वर RBI ने धडक कारवाई केली. तपासात अनेक कारनामे समोर आले. त्यानंतर पेटीएम संदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अर्थात पेटीएमने त्यांची बाजू स्पष्ट केली. युपीआय पेमेंटवर बंदी नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण तरीही या प्रकारामुळे सरकार अलर्ट झाले आहे. हा प्रकार केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला आहे. बाजारात इतर पण ॲप आहेत. त्याचा पण थेट फायदा ग्राहकांना घेता येणार आहे. पण सरकार याविषयी ठोस धोरण आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.

युपीआय मार्केटचा बादशाह कोण?

काही दिवसांपूर्वी एक अहवाल समोर आला होता. त्यात गुगल पे आणि फोन पे हे युपीआय मार्केटमध्ये अग्रेसर असल्याचा दावा करण्यात आला होता. सध्याच्या पेटीएम संकटाचा या दोन्ही ॲपला 15-20% फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात UPI मार्केट मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचा भारतीय ॲपला फायदा होण्यासाठी सरकार ठोस धोरण आखत आहे. भारतीय ॲपचा वापर वाढविण्यासाठी ‘Make In India’ वर जोर देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

युपीआयचा कुठे आहे BHIM?

सध्या देशात सर्वाधिक वापरकर्ते Phone Pay चे आहेत. त्यानंतर Google Pay चा क्रमांक लागतो. तर भारतीय ॲप BHIM UPI याबाबतीत सर्वात पिछाडीवर आहे. केंद्र सरकारसाठी हे फार मोठे आव्हान आहे. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. आता BHIM UPI ने पण ऑफरचा वर्षाव केला आहे. या ॲपमध्ये पण अनेक बदल करण्यात आले आहे. ते युझर्स फ्रेंडली करण्यावर जोर देण्यात येत आहे.

UPI मध्ये ठरणार BHIM

UPI हा सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. त्यात BHIM या स्वदेशी ॲपला आघाडी घेता आली नाही. ते पिछाडीवर पडले. पेटीएमच्या कारनाम्यामुळे आता सरकारने देशी ॲपला प्राधान्य देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे समजते. त्यासाठी ‘Make In India’ वर जोर देण्यात येणार आहे. भीम युपीआयवर पण मोठ्या ऑफर्स देण्यात येतील. तसेच काही धोरणात्मक बदल करुन या ॲपला पुढे आणण्यात येईल. BHIM App चे युझर वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्
मराठा तरूणांसाठी दिलासा, MPSC पदभरतीत जागांची वाढ नवी जाहिरात प्रसिद्.
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?
दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल, तिघे निर्दोष तर किती आरोपींना जन्मठेप?.
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार
गद्दारी, दावोसचा दौरा अन गुलाबी थंडी; चतुर्वेदी- शिंदे गटात वार-पलटवार.
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?
कमळाऐवजी तुतारीच्या प्रचार, छगन भुजबळांवर शिंदेच्या आमदाराचा आरोप काय?.
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित
मतदानाचे 2 टप्पे बाकी अन् पवारांनी किती जागा जिंकणार केलं थेट भाकित.
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.