AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दिशेला चुकूनही लावू नका तुळशीचे रोप, नाहीतर घरात गरिबी येईल हे निश्चित

तुळशीला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार या चुकीच्या दिशेने तुळशीचे रोपं लावल्याने नकारात्मक परिणामाचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या दिशेला रोपं लावणे टाळावे.

'या' दिशेला चुकूनही लावू नका तुळशीचे रोप, नाहीतर घरात गरिबी येईल हे निश्चित
Basil plant
| Edited By: | Updated on: Mar 12, 2026 | 2:38 PM
Share

तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. हिंदू आध्यात्मिक परंपरेत तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की तुळशीचे रोप भगवान विष्णूंना प्रिय आहे, आणि म्हणूनच ज्या घरामध्ये व अंगणात तुळशीचे रोपं असतं त्या ठिकाणी शांती, आनंद आणि समृद्धी येते. शास्त्रांनुसार तुळस ही सकारात्मक उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र तुळशीचे रोपं तुम्ही जर योग्य दिशेने लावल्यास पूर्ण फायदे मिळतात. अनेक घरांमध्ये तुळशीचे रोपं नकळत चुकीच्या दिशेने लावले जातात, त्यामुळे घरावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते, तर चला जाणून घेऊया वास्तूनुसार तुळशीचे रोपं कुठे लावावे आणि कुठे लावू नये…

दक्षिण दिशेला तुळशीचे रोपं लावू नये.

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पूर्वज आणि देवतांची दिशा मानली जाते. या दिशेने तुळशीचे रोप लावणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे कौटुंबिक कलह, आर्थिक नुकसान आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

नैऋत्य दिशेला तुळशी लावू नका

धार्मिक मान्यतेनुसार नैऋत्य दिशेवर राहूचा सर्वात जास्त प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यामुळे असे म्हटले जाते की या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि कामात अडथळे निर्माण होतात.

तुळशीचे रोप अंधारात लावू नका

तुळशीच्या रोपांना निरोगी वाढीसाठी सूर्यप्रकाश आणि ताजी हवा आवश्यक असते, म्हणून ती अंधाऱ्या खोल्याच्या आसपास, तळघर किंवा मर्यादित सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी लावू नयेत. असे म्हटले जाते की अशा ठिकाणी तुळशीचे रोपं लावल्याने रोपं सुकेल आणि त्यामुळे घरातील वातावरण देखील बिघडेल.

गणपतीच्या मूर्तीजवळ तुळस ठेवू नका

पौराणिक कथेनुसार गणपतीच्या पूजे दरम्यान तुळशीचा वापर निषिद्ध आहे, म्हणून तुळस गणपतीच्या मूर्तीसमोर किंवा त्याच्या खूप जवळ ठेवू नये. असे मानले जाते की असे केल्याने घरातील समृद्धी कमी होते.

तुळशीसाठी स्वच्छता खूप महत्वाची आहे

वास्तुशास्त्रानुसार तुळस ही एक पवित्र रोपं आहे आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाच्या आसपास कचरा आणि धूळ नसावा. शिवाय, बूट, चप्पल आणि झाडू यासारख्या वस्तू जवळ ठेवू नयेत. काटेरी झाडे जसे की निवडुंग देखील तुळशीजवळ लावू नयेत.

तुळशी लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा

वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला किंवा मध्यभागी ब्रह्मस्थान तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की ते आर्थिक अडचणी दूर करते आणि संपत्ती आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करते. तसेच घराच्या अंगणात हिरवेगार तुळशीचे रोप लावल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात प्रेम आणि आनंद वाढतो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर