AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानी यांची संपत्ती जर त्यांच्या मुलांमध्ये वाटली; तर आकाश, ईशा अन् अनंत अंबानी किती श्रीमंत होतील? थेट..

मुकेश अंबानी यांचा समावेश हा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये होतो. तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? समजा मुकेश अंबानी यांची संपत्ती त्यांच्या मुलांमध्ये वाटली गेली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती संपत्ती येऊ शकते?

मुकेश अंबानी यांची संपत्ती जर त्यांच्या मुलांमध्ये वाटली; तर आकाश, ईशा अन् अनंत अंबानी किती श्रीमंत होतील? थेट..
Mukesh Ambani Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 31, 2026 | 9:32 PM
Share

मुकेश अंबानी यांचा समावेश हा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमध्ये होतो. उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती ही कायमच चर्चेचा विषय राहिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी तेल, गॅस, आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादनाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. आज त्यांच्या व्यवसायाचा एवढा प्रचंड विस्तार झाला आहे की, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील त्यांच्या उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. 28 ऑक्टोबर रोजी त्यांची टेलीकॉम कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड’ लिस्टेड झाली आहे. यासोबतच जीओ ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. पहिल्या क्रमांकावर जीओची पॅरंट कंपनी असलेली ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आहे. याचाच अर्थ असा की, भारतामधील दोन्ही सर्वात मोठ्या कंपन्या या मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या आहेत. रिलायन्स कंपनीचं कॅपिटल 15,76,405 कोटी रुपये एवढं आहे. तर जिओचं मार्केट कॅपिटल 13,18,089 कोटी रुपये एवढं आहे.

मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती किती आहे, आणि समजा ती त्यांचे तीन मुलं आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी यांच्यामध्ये वाटली गेली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती संपत्ती येऊ शकते? ते किती श्रीमंत होतील? फॉर्ब्सच्या रियल टाइम बिलियनेयर्स लिस्टनुसार 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण संपत्ती 80 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास अंबानी यांच्याकडे एकूण 7.5 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. मुकेश अंबानी यांचा समावेश हा जगातील टॉप श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये होतो.

सध्या मुकेश अंबानी हे 80 अब्ज डॉलर संपत्तीचे मालक आहेत, त्यांना तीन मुलं आहेत. जर समजा या संपत्तीचे समान वाटे केले तर प्रत्येकाच्या वाट्याला 26.67 अब्ज डॉलर एवढी संपत्ती येते. भारतीय रुपयांमध्ये या संपत्तीचा हिशोब लावायचा झाल्यास प्रत्येकाच्या वाट्याला 2.40 लाख करोड एवढी संपत्ती येते. यावरून तुम्हाला कल्पना येईल की मुकेश अंबानी यांची मुलं ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी हे किती श्रीमंत होऊ शकतात?

Follow Us
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट