PNB कडून विशेष सुविधा सुरू, आता SMS द्वारे चेक पेमेंट थांबवता येणार, स्टेटमेंटही सेकंदात मिळणार

ही एक एसएमएस बँकिंग सुविधा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना मेसेजद्वारे सेकंद आणि मिनिटांमध्ये अनेक सेवा दिल्या जातील. जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवले, चेकचे टेन्शन त्रास देऊ लागले, तर या मेसेज सुविधेचा फायदा घेऊन क्षणात मोठ्या गोष्टी करता येतील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते बँकेत नोंदवावे लागेल.

PNB कडून विशेष सुविधा सुरू, आता SMS द्वारे चेक पेमेंट थांबवता येणार, स्टेटमेंटही सेकंदात मिळणार
Punjab National Bank

नवी दिल्लीः सरकारी बँक पंजाब नॅशनल बँक PNB ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केलीय. ही एक एसएमएस बँकिंग सुविधा आहे, ज्यामध्ये ग्राहकांना मेसेजद्वारे सेकंद आणि मिनिटांमध्ये अनेक सेवा दिल्या जातील. जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवले, चेकचे टेन्शन त्रास देऊ लागले, तर या मेसेज सुविधेचा फायदा घेऊन क्षणात मोठ्या गोष्टी करता येतील. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे खाते बँकेत नोंदवावे लागेल.

पंजाब नॅशनल बँकेच्या मते, एसएमएस बँकिंगद्वारे एकाच वेळी अनेक सुविधा मिळू शकतात. जर तुम्हाला चेकचे पेमेंट थांबवायचे असेल, तुमच्या खात्यातील शिल्लक तपासायचे असेल किंवा तुमच्या खात्याचे मिनी स्टेटमेंट मोबाईलवर हवे असेल तर तुम्ही एसएमएस बँकिंगच्या सुविधेचा लाभ घेऊ शकता. हे काम खूप सोपे आहे आणि PNB पोर्टल ला भेट देऊन तुम्ही तुमची नोंदणी करू शकता.

एसएमएस बँकिंगची वैशिष्ट्ये

💠 जर ग्राहकाचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल तर एसएमएस अलर्टच्या स्वरूपात अनेक माहिती प्राप्त होईल
💠 तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या खात्याबद्दल माहिती मिळवा
💠 ही सेवा घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 5607040 वर मेसेज पाठवावा लागेल.
💠 यासाठी तुम्हाला 5607040 या क्रमांकावर एसएमएसमध्ये PNB PROD पाठवावा लागेल.
💠 या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरची नोंदणी तुमच्या जवळच्या शाखेत जाऊन करावी लागेल.

सेवेचा लाभ कसा घ्यावा?

💠 तुम्ही खात्याची शिल्लक तपासण्यासाठी, मिनी स्टेटमेंट मिळवण्यासाठी, स्टेटस चेक करण्यासाठी, चेक पेमेंट थांबवण्यासाठी आणि दररोज 5,000 रुपयांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी या सेवेचा लाभ घेऊ शकता.
💠 शिल्लक चौकशीसाठी, आपल्याला BAL स्पेस 16 अंकी खाते क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून 5607040 वर पाठवावा लागेल
मिनी स्टेटमेंटसाठी MINSTMT स्पेस 16 अंकी खाते क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून लिहा आणि 5607040 वर पाठवा
💠 5000 रुपयांपर्यंत निधी हस्तांतरणासाठी, SLFTRF space FROM space to A/C space amount टाईप करा आणि 5607040 वर पाठवा.

अलर्ट सेवा वैशिष्ट्यं

तुम्हाला कार्ड (एटीएम, पीओएस, ई-कॉमर्स), इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, सीडीएम इत्यादी व्यवहारांसाठी एसएमएस अलर्ट मिळतील. ही सेवा मिळवण्यासाठी प्रत्येक तिमाहीत 15 रुपये बचत खात्यावर भरावे लागतील. 25 रुपये प्रति तिमाही बचत खात्याव्यतिरिक्त इतर खात्यावर भरावे लागतील. हे शुल्क मूलभूत बचत ठेव खाते, जन धन खाते, ज्येष्ठ नागरिक खाते, विद्यार्थी खाते, मित्र खाते, कर्मचारी आणि माजी कर्मचारी खाते यावर लागू नाही.

एसएमएस बँकिंगचे फायदे

याचे अनेक फायदे आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या नकळत तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार होत असेल तर तुम्हाला त्याविषयीची माहिती लगेच मिळेल. फसवणूक टाळण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. आता तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंतच्या निधी हस्तांतरणासाठी बँक शाखेत जाण्याची गरज भासणार नाही. घरी बसून मोबाईलवरून हे काम करता येते. यासाठी तुम्हाला फक्त एक मेसेज पाठवावा लागेल. हे काम काही सेकंदात होईल. अशा अनेक सेवा आहेत, ज्यांच्यासाठी बँकेच्या शाखेला भेट देण्याची गरज एसएमएस बँकिंगद्वारे दूर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

पॅन कार्ड, पेन्शन, पीएफसह ‘या’ 7 सेवांसाठी आधार द्यावा लागणार, जाणून घ्या संपूर्ण तपशील

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 50 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार, जाणून घ्या

Special facility launched by PNB, now check payment can be stopped via SMS, statement will also be available in seconds

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI