AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 50 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार, जाणून घ्या

अॅमेझॉन अमेरिकेत 55,000 पेक्षा जास्त नोकऱ्यांपैकी 40,000 हून अधिक भरती करेल. भारत, जर्मनी आणि जपान यांसारखे उर्वरित देश त्यांच्या जॉब फेअर अॅमेझॉन करिअर डेद्वारे भरती होतील. हे 30 जूनपर्यंत गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि फेसबुकच्या जवळ आहे.

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 50 हजारांहून अधिक नोकऱ्या देणार, जाणून घ्या
mphc pa vacancy 2021
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 11:04 AM
Share

नवी दिल्लीः जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन येत्या काही महिन्यांत बंपर नोकऱ्या देणार आहे. जागतिक पातळीवर कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकांसाठी अॅमेझॉनने 55,000 लोकांना कामावर घेण्याची योजना आखलीय. अॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अँडी जेसी यांनी रॉयटर्सला ही माहिती दिली. जेसीने सांगितले की, अॅमेझॉनचा वार्षिक रोजगार मेळा 16 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. अॅमेझॉन अमेरिकेत 55,000 पेक्षा जास्त नोकऱ्यांपैकी 40,000 हून अधिक भरती करेल. भारत, जर्मनी आणि जपान यांसारखे उर्वरित देश त्यांच्या जॉब फेअर अॅमेझॉन करिअर डेद्वारे भरती होतील. हे 30 जूनपर्यंत गुगलच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि फेसबुकच्या जवळ आहे.

जेसी म्हणाले, ‘करिअर डे’ https://www.amazoncareerday.com खूप समयोचित आणि खूप उपयुक्त आहे. कंपनीने म्हटले आहे की, नवीन नियुक्त्या अॅमेझॉनच्या तांत्रिक आणि कॉर्पोरेट कामगारांच्या संख्येत 20 टक्के वाढ दर्शवतील, जे सध्या जागतिक स्तरावर सुमारे 275,000 आहे.

रोजगार मेळावा कधी सुरू होईल?

अॅमेझॉन करिअर डे गुरुवारी 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. कंपनी म्हणते की, हा संवादात्मक अनुभव सर्व नोकरी शोधणाऱ्यांसाठी आहे. तुमचा अनुभव कितीही असो, व्यावसायिक क्षेत्र किंवा पार्श्वभूमी कोणतीही असो, तुम्हाला अॅमेझॉन किंवा इतरत्र काम करण्यास स्वारस्य असल्यास तुम्हीही अर्ज करू शकता.

अशा प्रकारे नोंदणी करा?

अॅमेझॉन करिअर डेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. सर्वप्रथम https://www.amazoncareerday.com वर जा. तुमचा देश येथे निवडा. यानंतर ‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा आणि पुढे तुमच्या तपशीलांसह फॉर्म भरा. कंपनी अधिक गोदाम तयार करण्यासाठी आणि कामगारांना आकर्षित करण्यासाठी वेतन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहे. खरेदीदारांकडून त्यांच्या घरी पोहोचवल्या जाणाऱ्या उत्पादनांची जोरदार मागणी पूर्ण करण्यासाठी अॅमेझॉन खूप स्पर्धात्मक काम करत असल्याचंही जेसी यांनी सांगितले.

पगार किती असेल?

ज्यांना अमेझॉन जॉब फेअरमध्ये नोकऱ्या मिळतात, त्यांना किमान 1,100 रुपये प्रति तास म्हणजे 15 $ डॉलर मिळतील. काही राज्यांसाठी सुरुवातीचा पगार 1240 रुपये प्रति तास (17 डॉलर) असेल. अॅमेझॉनचा जॉब फेअर जागतिक स्तरावर आयोजित केला जाईल. याचा अर्थ जगभरातील लोक त्यात सहभागी होऊ शकतात.

संबंधित बातम्या

मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत दररोज 7 रुपये गुंतवा, दरमहा 5000 कमवा, नेमकी योजना काय?

तुमच्या रिकाम्या दुकानात SBI ATM कसे लावायचे? जाणून घ्या बँकेचा नियम

The world’s largest e-commerce company will provide more than 50,000 jobs, find out

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.