AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अडथळा कसला? संजय राऊतांनी थेट कारण सांगितलं, म्हणाले..

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर संजय राऊतांनी भाष्य केलं. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला नेमका कसला अडथळा आहे, याविषयी मोठं भाष्य केलं.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अडथळा कसला? संजय राऊतांनी थेट कारण सांगितलं, म्हणाले..
sanjay raut on ncp merger Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 10:43 AM
Share

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा थांबेना झाली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी सुनेत्रा पवारांच्या गटातील नेत्यांकडून नवनवीन दावे केले जात आहेत. काल दिवसभरात शरद पवार गटात एनडीएमध्ये सहभागी होईल, असा दावा करण्यात आला. परंतु सुप्रिया सुळे यांनी सर्व दावे फेटाळून लावले. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होऊ शकत नाही. विलीनीकरणाचे अडथळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.  ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवर संजय राऊत यांनी म्हटलं की, मी विलीनीकरणावर परखड मत मांडले. आम्ही शरद पवारांवर प्रेम करतो. त्यांच्या पक्षाला मार्गदर्शन करणारे आम्ही नाहीत. परंतु जनतेच्या भावना व्यक्त करणारा लेख होता. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा खेळ थांबला पाहिजे. सर्व जण इंडिया आघाडीत आहोत. संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. अमित शहा यांचे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांचा पक्ष वाऱ्यावरती वरात आहे.  खरंतर पक्ष हा शरद पवारांचा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आहे. पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. तीन प्रमुख पक्ष आहेत’.

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांपेक्षाही मी ठामपणे सांगत होतो की, कधीही विलीनीकरण होणार नाही.  विलीनीकरण हे राजकीय,भावनिक आणि नैतिकदृष्ट्या शक्य नाही. कोणी कोणाचं नेतृत्व मान्य करायचं. शरद पवार यांच्यासारखे टोलेजंग नेते आहेत. आम्ही त्यांना नेते मानतो. मुळात नेतृत्व कोण करणार हा प्रश्न आहे., असे राऊत म्हणाले.  उदय सामंत यांनी केलेल्या ऑपरेशन टायगरवर देखील राऊतांनी भाष्य केलं.

राऊत म्हणाले, ‘कोण काय बोलतं, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाची अवस्था पाहिली तर , ना घरका ना घाटका…त्यांना स्वाभिमान गुंडाळून काम करावं लागतंय. दोन्ही अमित शहा यांचे पक्ष आहेत. त्यांना विचारधारा नाही. तसेच भूमिका नाही. हवेची एक झुळूक आली, सर्व उडून जातील. सत्तेच्या फेविकॉलने सर्व जोडलेले आहेत. उदय सामंत हे कुठे असतील, त्यांना विचारा. ऑपरेशन टायगर …म्हणजे आम्ही टायगर आहोत, ते मान्य करताहेत. त्यांच्यासारखे उड्या मारणारे माकड नाहीत. इथून तिथे..तिथून इथे…त्यांनी आता त्यांचा पक्ष सांभाळावा. अमित शहा यांचे दोन पक्ष आहेत. त्यांनी सांभाळावे’.

Follow Us
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक
ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने..
Shivsena : ऑपरेशन टायगर निश्चित, पण तारीख गुलदस्त्यात; उदय सामंतांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण