AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

| Updated on: Nov 15, 2026 | 10:36 AM
Share

खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी उत्साहात साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापून आणि पुष्पगुच्छ स्वीकारून राऊतांनी त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

खासदार संजय राऊत यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेले कार्यकर्ते सकाळपासूनच निवासस्थानाबाहेर जमले होते.

वाढदिवसानिमित्त संजय राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आणलेले विविध केक त्यांनी या ठिकाणी कापले. पुष्पगुच्छ देत आणि केक कटिंग करत उपस्थित समर्थकांनी राऊतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थितांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. संजय राऊत यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्यावरील प्रेम या निमित्ताने व्यक्त केले. राजकीय वर्तुळात नेहमी सक्रिय असणाऱ्या संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या या गर्दीतून त्यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

 

Published on: Nov 15, 2026 10:36 AM

Follow Us