AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ बँकेने व्याजदर वाढवले, आता दरमहा किती हप्ता भरावा लागणार?

Loan EMI Increase: एसबीआयने कर्जदारांना धक्का दिला आहे. काही कर्जांचे व्याजदर वाढण्यात आले आहेत. यामुळे आता कर्जदारांवर ईएमआयचा भार वाढणार आहे.

कर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' बँकेने व्याजदर वाढवले, आता दरमहा किती हप्ता भरावा लागणार?
| Updated on: Oct 15, 2026 | 3:52 PM
Share

आजच्या वाढत्या महागाईत एका व्यक्तीचे उत्पन्न कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे नाही. यामुळेच लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक कर्जाकडे वळतात. जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गृह कर्ज किंवा इतर कोणतेही कर्ज असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एसबीआय बँकेने ठराविक कालावधीच्या कर्जांवरील व्याजदर वाढवले ​​आहेत.

याचा अर्थ असा की, ज्या ग्राहकांच्या कर्जाचे व्याजदर या दरांशी जोडलेले आहेत, त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावे लागू शकतात. त्यामुळे एसबीआयच्या ग्राहकांसाठी बँकेने नेमके कोणते दर बदलले आहेत आणि या बदलांचा त्यांच्या ईएमआयवर कसा परिणाम होईल, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) ७.५० टक्क्यांवरून ७.७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, जी ०.२५ टक्क्यांची वाढ आहे.

या दरात सीआरपी (CRP) जोडला जाईल. व्याजदरातील या वाढीचा परिणाम या ग्राहकांच्या ईएमआयवर होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे, एसबीआयने ठराविक कालावधीसाठी आपला एमसीएलआर (MCLR) देखील वाढवला आहे. एक वर्षाचा एमसीएलआर ८.७० टक्क्यांवरून ८.८५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर तीन महिन्यांचा दर ८.२५ टक्क्यांवरून ८.४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

याशिवाय सहा महिन्यांचा दर ८.७५ टक्क्यांपर्यंत आणि तीन वर्षांचा दर ८.९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एक महिन्याचा आणि ओव्हरनाइट एमसीएलआर ७.८५ टक्क्यांवर कायम आहे. एसबीआयने आपला एक्सटर्नल बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट ७.९० टक्क्यांवरून ८.१५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. ही ०.२५ टक्क्यांची वाढ आहे. या दरात सीआरपी (CRP) आणि बीएसपी (BSP) यांचाही समावेश असेल.

याचा अर्थ असा की, ज्यांची कर्जे या दरांशी जोडलेली आहेत त्यांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावे लागू शकतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, हा बदल कधी लागू होईल? हे नवीन दर १५ ऑक्टोबर २०२६ पासून लागू झाले आहेत. एसबीआयने आजपासून हे नवीन दर लागू करण्यासाठी एक अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. आज हे दर लागू झाल्यानंतर तुमच्या मासिक ईएमआयवर होणारा परिणाम तुमचे कर्ज ज्या बेंचमार्कशी जोडलेले आहे त्यावर अवलंबून असेल.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...