SBI Alert: स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करण्याचा सल्ला, अन्यथा पैशांचे व्यवहार बंद होणार

देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌ॅलर्ट जारी केला आहे. State Bank of India PAN Aadhar

SBI Alert: स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना इशारा, 30 जूनपूर्वी 'हे' काम करण्याचा सल्ला, अन्यथा पैशांचे व्यवहार बंद होणार
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 2:14 PM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेंने त्यांच्या ग्राहकासाठी एक अ‌ॅलर्ट जारी केला आहे. पुढील काळात निर्माण होणाऱ्या अडचणींपासून वाचण्यासाठी बँकेच्या ग्राहकांनी 30 जूनपूर्वी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिकं करुन घ्यावं, अशा सूचना बँकेनं दिल्या आहेत. सीबीडीटी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स विभागानं पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवली आहे. (State Bank of India SBI issue alert to customer to link PAN Aadhar before 30 June )

स्टेट बँकेचं ट्विट

स्टेट बँक ऑफ इंडियानं ट्विट करुन त्यांच्या ग्राहकांना सूचना दिली आहे. बँकेच्या सेवांचा कोणत्याही अडचणीशिवाय लाभ घ्यायचा असेल तर पॅन आणि आधार कार्ड लिंक करुन घ्यावं. पॅन आणि आधार कार्ड लिंक करणं आवश्यक आहे. पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बंद होऊ शकते. तुम्हाला कोणताही व्यवहार करता येणार नाही. त्यामुळे 30 जूनपूर्वी पॅन आधार लिकं करुन घ्या, असं बँकेकडून कळवण्यात आलं आहे.

पॅन आधार लिंक करण्यास मुदवाढ

पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज 31 मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख वाढवण्यात आलीय. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख 30 जून 2021 पर्यंत वाढवली आहे.

अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक

यासाठी, आपल्याला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/AhaarPreloginStatus.html वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंकआधार स्टेटस वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल. जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता.

एसएमएसद्वारे करु शकता लिंक

जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा. ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात.

असे करा ऑफलाईन लिंक

पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी! RBI ने ऑटो पेमेंटची सुविधा थेट 6 महिन्यांसाठी वाढविली

PAN-AADHAR LINK : खूशखबर! पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत लिंक करता येणार

(State Bank of India SBI issue alert to customer to link PAN Aadhar before 30 June )

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.