AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजारात राहणार तेजीत? कोणता स्टॉक करणार मालामाल, समजून घ्या बाजाराची चाल..

Share Market : शेअर बाजार पुढील आठवड्यात छप्परफाड कमाई करुन देणारा का?

Share Market : शेअर बाजारात राहणार तेजीत? कोणता स्टॉक करणार मालामाल, समजून घ्या बाजाराची चाल..
शेअर बाजारात पुन्हा तेजी?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 06, 2022 | 3:37 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजार (Indian Share Market) सोमवारी काय चालणार चाल? स्टॉक मार्केटमध्ये असेल तेजी की येईल मंदीची लाट? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या (Investors) मनात आहे. तेव्हा बाजारात भावनेचा बाजार चालणार की, परदेशी गुंतवणूकदार पुन्हा प्रभाव टाकणार हे पाहुयात..

बाजार पुढील आठवड्यात तेज राहिल अशी शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामागचे प्रमुख कारण हे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) आहेत. परदेशी गुंतवणूकदारांचा बाजाराकडे पुन्हा ओढा वाढला आहे. परिणामी बाजार नवीन उंची गाठण्याची शक्यता आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, या आठवड्यात अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येतील. तर काहींचे निकाल जाहीर होतील. जागतिक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदार यांची भूमिका बाजाराची दिशा ठरवतील.

सोमवारी बाजार सुरु होईल. तर मंगळवारी गुरु नानक जयंतीमुळे बाजाराला सुट्टी राहिल. त्यामुळे या आठवड्यात पाच दिवस नाही तर केवळ चार दिवस उलाढाल होईल.औद्योगिक उत्पादन सूचकांकची आकडेवारीही याच आठवड्यात घोषीत होणार आहे.

बाजारात पुढील आठवड्यात बीपीसीएल, कोल इंडिया, टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, हिंडाल्को आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या कंपन्यांचे तिमाही निकाल हाती येतील. या कंपन्याच्या निकालाचाही परिणाम बाजारावर होईल.

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने जुलै-सप्टेंबर या तिमाहीत निव्वळ 74 टक्क्यांचा लाभ मिळविला आहे.एसबीआयने 13,265 कोटींचा फायदा मिळवला. याचाही परिणाम बाजारात दिसून येईल.

जवळपास दोन महिन्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात जोरदार पुनरागमन केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.  त्यामुळे बाजारात तेजी राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Follow Us
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!