अमेरिका आणि कोरोना लसमुळे शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांनी कमावले 8.80 लाख कोटी रुपये

| Updated on: Nov 10, 2020 | 10:56 AM

अमेरिकन निवडणुकीत (America election) जो बियाडन यांचा विजय (Joe Biden wins) आणि कोरोना लसीविषयी (corona vaccine) होणाऱ्या दाव्यांमुळे शेअर बाजाराला मोठी चालना मिळाली आहे.

अमेरिका आणि कोरोना लसमुळे शेअर बाजारात उसळी, गुंतवणूकदारांनी कमावले 8.80 लाख कोटी रुपये
Follow us on

नवी दिल्ली : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगवारीही घरेलू शेअर बाजाराला नवीन उच्चांकासह सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 361.82 अंकांच्या वाढीसह 42,959.25 च्या उच्चांकावर उघडला. याचबरोबर निफ्टीने (Nifty) पहिल्यांदाच 12,500 पार केले आहेत. अमेरिकन निवडणुकीत (America election) जो बियाडन यांचा विजय (Joe Biden wins) आणि कोरोना लसीविषयी (corona vaccine) होणाऱ्या दाव्यांमुळे शेअर बाजाराला मोठी चालना मिळाली आहे. सलग सातव्या दिवशी शेअर बाजारात (stock market ) तेजी दिसून आली. यामुळे गुंतवणूकदारांनी 8.80 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. (stock market Sensex and nifty open at all time high because of America election and corona vaccine)

90 टक्क्यांहून अधिक कोरोना लसीचा प्रभाव
अमेरिकन औषधनिर्माण कंपनी Pfizer आणि जर्मन बायोटेक कंपनी यांनी दावा केल्यानुसार, कोरोनाचा नाश करण्यासाठी त्यांनी तयार केलेली लस ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. या दाव्याचा परिणाम जागतिक बाजारातही दिसून आला.

7 दिवसात गुंतवणूकदारांनी कमावले 8.80 लाख कोटी रुपये
गेल्या सातव्या दिवशी घेरलू बाजारात तेजी पाहायला मिळाली. बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा मिळाला आहे. 2 नोव्हेंबरला बीएसईवर एकूण कंपन्यांची मार्केट कॅप 1,57,18,574.96 कोटी रुपये होती, जी 10 नोव्हेंबरला 8,78,858.6 कोटी रुपयांनी वाढून 1,65,97,433.56 कोटी रुपये झाली.

दरम्यान, सोमवारी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारल्याचे समोर आले होते. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजार (BSE) 704 अंकांच्या तेजीसह 42,597 अंकावर स्थिरावला होता, तर राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) 197 अंकांच्या उसळीसह 12461 अंकावर स्थिरावला होता.

शेअर बाजार मागील 10 महिन्यांच्या तुलनेत सोमवारी सर्वोच्च स्तरावर गेल्याची नोंद करण्यात आली. जाणकारांच्या म्हणण्यानुसार अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतोय. निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात मागील 6 दिवसांपासून तेजी नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारातील ही तेजी आणखी काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.

इतर बातम्या –

जो बायडन जिंकले आणि भारतात गुंतवणूकदार मालामाल; दिवसाअखेर सेन्सेक्स, निफ्टीचा नवा रेकॉर्ड

Google Pay सह 5 बड्या कंपन्यांना मोठा झटका, CCI ने दिले चौकशीचे आदेश

(stock market sensex and nifty open at all time high because of America election and corona vaccine)