AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Share | 71 पैशांचा स्टॉक आता 35 रुपयांवर, अशी झाली कमाई

Multibagger Share | शेअर बाजारात या स्टॉकने धमाका केला आहे. या पेनी स्टॉकची भरारी दिग्गज कंपन्यांना थक्क करणारी आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षात कंपनीचा वारु उधळला आहे. या कंपनीमुळे गुंतवणूकदारांना सणासुदीत लॉटरी लागली आहे. आता ही कंपनी गुंतवणूकदारांना 4 बोनस शेअरचे गिफ्ट देणार आहे.

Multibagger Share | 71 पैशांचा स्टॉक आता 35 रुपयांवर, अशी झाली कमाई
| Updated on: Oct 21, 2023 | 3:39 PM
Share

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजाराने सलग तीन दिवस आपटी खाल्ल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. पण काही कंपन्यांनी अशा ही काळात गुंतवणूकदारांचे वाटोळे केले नाही तर त्यांचा खिसा भरला. त्यांना तगडा रिटर्न दिला. ही कमाल मोठ्या शेअर्सनी नाही तर पेनी शेअरने केली आहे. गेल्या तीन वर्षांत ज्यांनी हा शेअर खरेदी केला, त्यांच्या हाती जणू परीस लागला आहे. त्यांना कोणत्याच योजनेत इतका फायदा झाला नसता इतकी कमाई या एकट्या शेअरने त्यांना करुन दिली. हा शेअर तीन वर्षांत 4900 टक्के चढला आहे.

71 पैशांवरुन 35 रुपयांवर उडी

या कंपनीच्या स्टॉकने तीनच वर्षांत मोठी घौडदौड केली आहे. हा शेअर गेल्या तीन-साडेतीन वर्षांत पायाला भिंगरी लावून सूसाट पळाला आहे. त्याने गुंतवणूकदारांना तुफान कमाई करुन दिली. तीन वर्षांपूर्वी हा शेअर अवघ्या 71 पैशांवर होता. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. हा शेअर 35 रुपयांवर पोहचला आहे. त्याने या दरम्यान 4900 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांकी कामगिरी 46.10 रुपये आहे तर 52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 24.39 रुपये आहे.

1 लाखांचे झाले 50 लाखांहून जादा

हा शेअर 27 मार्च 2020 रोजी 71 पैशांवर होता. कंपनीचा शेअर 20 ऑक्टोबर 2023 रोजी 36.02 रुपयांवर होता. या कंपनीच्या शेअरने गेल्या साडेतीन वर्षांत 4973 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीत तीन वर्षांपूर्वी एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर या गुंतवणूकीचे मूल्य सध्या 50.73 लाख रुपये झाले असते. पण हा फायदा एवढ्यातच संपला असे नाही.

4 बोनस शेअरचे गिफ्ट

रामा स्टील ट्यूब्स (Rama Steel Tubes) असं या कंपनीचे नाव आहे. या कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 4:1 या प्रमाणात बोनस शेअर दिला होता. या मल्टिबॅगर कंपनीने प्रत्येक 1 शेअरवर 4 बोनस शेअर दिले होते. यापूर्वी कंपनीने मार्च 2016 मध्ये 4:1 अशा प्रमाणात बोनस शेअर दिला होता. कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये 5:1 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केला होता. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 1777 कोटी रुपये आहे. या स्मॉलकॅप कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 57.14 टक्के इतका आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप