AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधीकाळी 5000 पगार, आज 48 कोटींचा बिझनेस, महिलेची यशोगाथा वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

नयना वैद्य यांनी करोड क्लब नावाच्या पॉडकास्टमध्ये त्यांचा हा प्रवास सांगितलेला आहे. पुढे त्यांनी याच क्षेत्रात म्हणजेच औषध निर्माण करण्याच्या क्षेत्रात आपले करिअर करण्याचे ठरवले. त्यांनी पुढे ओम साई सर्जिकल्स नावाची एक कंपनी सुरू केली.

कधीकाळी 5000 पगार, आज 48 कोटींचा बिझनेस, महिलेची यशोगाथा वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
nayana vaidya success storyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 20, 2026 | 9:43 PM
Share

Success Story : कधीकाळी महिलांना शिक्षणाचीही संधी नव्हती. महिलांना मूलभूत हक्कांसाठी तसेच शिक्षणासाठी झटावे लागायचे. परंतु आज संधी मिळताच आम्हाही कमी नाहीत, हे महिलांनी दाखवून दिले आहे. आजघडीला आपल्या आजूबाजूला अनेक यशस्वी महिला आहेत. काही महिलांनी तर स्वत:छे उद्योग उभारलेले आहेत. या महिला स्वबळावर आज कोट्यवधीचे साम्राज्य उभं करताना दिसत आहेत. सध्या अशाच एका हरहुन्नरी महिलेची चर्चा होत आहे. या महिलेने अवघ्या पाच हजार रुपयांच्या नोकरीला लाथ मारून स्वत:च्या कंपनीच्या रुपात कोट्यवधीची उलाढाल करणारं साम्राज्य उभं केला आहे. या महिलेचे यश हे कित्येक तरुण महिलांना प्रेरणादायी ठरत आहे.

1997 साली होता पाच हजार पगार

या महिलेचे नाव आहे नयना वैद्य. त्यांना कधीकाळी फक्त पाच हजार रुपये पगार होता. आज त्यांनी 48 कोटी रुपयांचा व्यवसाय करणारी ‘ओम साई सर्जिकल्स’ (Om Sai Surgicals) नावाची एक कंपनी उभी केली आहे. ही एक हेल्थकेअर डिस्ट्रिब्यूशन करणारी कंपनी आहे. 1997 साली नयना वैद्य यांनी सुरुवातीला एका औषधं निर्माण करणाऱ्या कंपनीत सेल्स रिप्रझेंटिव्ह म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांचा पगार फक्त 5000 रुपये होता. त्यांनी फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे.

सुरुवातीला अनेक संकटं आली पण…

नयना वैद्य यांनी करोड क्लब नावाच्या पॉडकास्टमध्ये त्यांचा हा प्रवास सांगितलेला आहे. पुढे त्यांनी याच क्षेत्रात म्हणजेच औषध निर्माण करण्याच्या क्षेत्रात आपले करिअर करण्याचे ठरवले. त्यांनी पुढे ओम साई सर्जिकल्स नावाची एक कंपनी सुरू केली. या कंपनीतर्फे आरोग्यविषयक उपकरणांचे वितरण केले जाते. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक संकटं आली. परंतु या संकटांवर मात करून यशस्वी वाटचाल चालूच ठेवली. 2010 सालाच्या आसपास पहिल्यांदा त्यांच्या कंपनीची उलाढाल एक कोटीच्या घरात गेली.

घराची आजची किंमत चार कोटी

त्यांनी या कंपनीची सुरुवात 2000 साली केली होती. कंपनी चालू केल्यानंतर पूर्ण एका दशकाने त्यांच्या कंपनीने कोटीची उलाढाल केली. त्यांना काही ठिकाणाहून भाडेदेखील मिळते. त्यांनी 2019 साली एक घर खरेदी करण्यासाठी एक होम लोन घेतले होते. याच घराची आजची किंमत 4 कोटी रुपये आहे. त्यांच्या या यशाची सगळीकडे चर्चा होत आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल