AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसात भिजल्या काय आणि पाण्यात पडल्या काय… चिंताच नाही… जगातील या देशात प्लास्टिक नोटा चलनात… RBI ने कसली आता कंबर!

Polymer Plastic Notes: जगभरात प्लास्टिक नोटांचा वापर वाढला आहे. जवळपास 60 देशांमध्ये पॉलिमर नोटांचा वापर वाढला आहे. ज्यामध्ये काही देशांनी कागदी नोटा चलनातून जवळपास बाद केल्या आहेत. आता आरबीआयने प्लास्टिक नोटांसाठी कंबर कसली आहे.

पावसात भिजल्या काय आणि पाण्यात पडल्या काय... चिंताच नाही... जगातील या देशात प्लास्टिक नोटा चलनात... RBI ने कसली आता कंबर!
प्लास्टिक नोटा चलनात येणारImage Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: May 29, 2026 | 2:40 PM
Share

RBI Indian Polymer Plastic Notes: तुमच्या खिशातील आणि तिजोरीतील कागदी नोटा लवकरच इतिहासजमा होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नोटांची वाढती मागणी लक्षात घेत एक मोठे पाऊल टाकण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय बँकेने आता पारंपारिक कागदाऐवजी प्लास्टिक (Polymer) नोटा छापण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, मुंबई आणि पाटणा येथील बैठकीत आरबीआयची बैठक झाली. त्यात या विषयावर सखोल चर्चा झाली. अर्थात जगातील अनेक देशांनी कागदी नोटा या चलनातून बाद केल्या आहेत. युरोपसह पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये प्लास्टिक नोटांचाच वापर करण्यात येतो. त्यामुळे तिथला चलन छपाईचा खर्च खूप कमी झाला आहे. प्लास्टिक नोटा या दीर्घकाळ टिकत असल्याने दरवर्षी येणारा छपाई खर्च कमी होतो.

पॉलिमर करन्सी अडीच पट काळ टिकते अधिक

कागदी नोटा हटवण्यामागील सर्वात मोठे कारण अर्थातच अतिरिक्त खर्च हाच आहे. या नोटांचे आयुष्य फार नसल्याने त्या लवकर खराब होतात. तर या नोटा हाताळताना पुरेशी काळजी न घेतल्याने त्या फाटतात. त्यांना टेपच्या सहाय्याने चिकटवण्यात येते. या नोटा परत बँकेकडे येतात. त्यामुळे प्लास्टिक नोटांची मागणी वाढली आहे. या नोटावर पाणी, दमटपणाचा परिणाम होत नाही. त्या लवकर खराब होत नाही. त्या फाटत नाहीत. विशेष म्हणजे या नोटा वारंवार छापण्याची झंझट नसते. या नोटा जळण्याचा टक्का ही फार नाही. जगातील अनेक देशांनी प्लास्टिक नोटांचा पर्याय स्वीकारला आहे.

या देशांनी स्वीकारल्या प्लास्टिक नोटा

ऑस्ट्रेलिया: प्लास्टिक नोटा चलनात आणणारा हा पहिला देश आहे. 1988 मध्ये या देशाने पॉलिमर नोटा चलनात आणल्या होत्या. त्यावेळी हा जगातील एकमेव देश होता, जिथे प्लास्टिक नोटांचे उत्पादन आणि वापर होत होते.

न्युझीलंड : वर्ष 1999 मध्ये या देशाने कागदी नोटा हद्दपार केल्या. या देशात सर्वात छोटी नोट ही 5 डॉलरची तर सर्वात मोठी नोट ही 100 डॉलरची आहे.

ब्रूनेई: दक्षिण-पूर्व आशियातील या सर्वात श्रीमंत देशात बनावट आणि खोट्या नोटांना आळा घालण्यासाठी सर्वात अगोदर प्लास्टिक, पॉलिमर नोटा बाजारात आणण्यात आल्या. या देशातील डुप्लिकेट नोटांना आळा घालण्यात यश आले.

व्हिएतनाम: या देशात 2003 मध्ये पॉलिमर नोटांची एंट्री झाली. आज व्हिएतनाम डोंग पूर्णपणे प्लास्टिकचे आहे. येथील सर्वात मोठी नोट ही 5 लाखांची आहे. ती जवळपास 20 अमेरिकन डॉलर मू्ल्याइतकी आहे.

रोमानिया: युरोपातील या देशाने सर्वात अगोदर 2005 मध्ये कागदी नोटांना रामाराम ठोकून पॉलिमर नोटांचा वापर सुरू केला.

पापुआ न्यू गिनी: येथे 1975 पर्यंत ऑस्ट्रेलियन डॉलर चलनात होता. त्यानंतर या देशाने ‘कीना’ नावाने नवीन चलन बाजारात आणले. हे पूर्णपणे प्लास्टिक चलन आहे.

10 रुपयांची प्लास्टिक नोट का बारगळली?

आरबीआयच्या 2015-16 मधील वार्षिक अहवालानुसार, 10 रुपयांच्या लाखो प्लास्टिक नोटा बाजारात आणण्याची योजना आखण्यात आली होती. प्रायोगिक तत्वावर ही दहा रुपयांची प्लास्टिक नोट कोच्ची, म्हैसूर, शिमला, जयपूर आणि भुवनेश्वरमध्ये बाजारात आणण्यात येणार होती. भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड आणि सिक्युरिटीज प्रिटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने प्रकल्प हाती घेतला होता. पण देशात उच्च तापमानामुळे या नोटांना आग लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आणि ही योजना बारगळल्याचा दावा करण्यात येतो.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल