AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today gold,silver rates : दिवाळी सोन्याविनाच, सोनं, चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, दरात मोठी वाढ

सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे, आज देखील सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहयला मिळत आहे. सोनं -चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर पोहोचलं आहे.

Today gold,silver rates : दिवाळी सोन्याविनाच, सोनं, चांदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर, दरात मोठी वाढ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 19, 2025 | 3:56 PM
Share

सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे, आज देखील सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ पाहयला मिळत आहे. गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोन्या-चांदीचे भाव तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहेत. याचा मोठा फायदा हा सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना होताना दिसून येत आहे. आता सोन्यामधून मोठा परवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र अजूनही सोन्याचे भाव वाढू शकतात असा अंदाज असल्यानं सोन्यामधील गुंतवणूक सुरूच आहे.

जळगावच्या सराफा बाजारात गेल्या नऊ महिन्यात सोन्याच्या दरात तब्बल 31 हजार 800 रुपये तर चांदीच्या दरात 40 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात सोन्याचे दर 78 हजार 500 रुपये प्रति तोळा आणि चांदीचा दर  89 हजार 500 रुपये प्रति किलो एवढे होते. नऊ महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात  सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज सोन्याचे दर विना जीएसटी प्रति तोळा 1 लाख 10 हजार 300 रुपयांवर पोहोचले आहेत.  तर चांदीचे दर विना जीएसटी 1 लाख 29 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या नऊ महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात तब्बल 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं जळगावमधील सराफा व्यवसायिकांनी सांगितले आहे.  केवळ नऊ महिन्यात सोन्याचे दर  तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्यामुळे सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना याचा चांगला परतावा देखील मिळत असल्याचं सराफा व्यावसायिकांनी म्हटलं.

रशिया युक्रेन युद्ध, डॉलरच्या दरात झालेली वाढ तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे टेरिफ रेट संदर्भातलं धोरण या सर्व गोष्टींचा सोन्या आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे. जागतिक परिस्थिती सातत्यानं बदलत असल्यामुळे सोन्या-चांदीचे दर देखील वाढत असल्याचं सराफा व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दरम्यान दिवाळीत सोन्याचे दर सव्वा लाख तर चांदीचे दर दीड लाखांपर्यंत पोहोचतील असा अंदाज देखील सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.

सोन्याच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे बजेट कोलमडले आहे, हौस कशी पूर्ण करायची असा सवाल आता महिलांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सोन्याचे दर सतत वाढत असल्याने महिलांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे, कुठेतरी सोन्याचे दर कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा देखील यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?