आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, बर्गर किंगला 20 टक्क्यांनी अप्पर सर्किट

| Updated on: Dec 16, 2020 | 4:07 PM

आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजातही मोठी तेजी पाहायला मिळाली. (sensex nifty share price)

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, बर्गर किंगला 20 टक्क्यांनी अप्पर सर्किट
Follow us on

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात आलेल्या तेजीमुळे भारतीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजातही मोठी तेजी पाहायला मिळाली. आठव्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी मुंबई शेअर बाजार 310 अंकांच्या तेजीसह 46573 अंकानी सुरु झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार 96 अंकांच्या तेजीसह 13663.10 अंकांनी सुरु झाला. (Today’s stock market sensex nifty share price details)

आंतरराष्ट्रीय बाजारावर झालेल्या सकारात्मक परिणामामुळे भारतीय शेअर बाजारात ही तेजी आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सकाळी सिंगापूरचा SGX Nifty बाजार 90 अंकांनी वधारला होता. त्याचा आणि इतर आंततराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे. चालू व्यापारात मुंबई शेअर बजार 46,599.02 अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीनेही नवी उंची गाठत 13,666.45 चे शिखर गाठले आहे.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी

बाजाराच्या सुरुवातीला एकूण 1094 कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी बघायला मिळाली. तसेच, 250 कंपन्यांच्या शेअर्सची किंमत कमी झाल्याचे पाहाया मिळाले. भारतीय शेअर बाजारात M&M, ONGC, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मेटल और ऑटो क्षेत्रातील उद्योगांच्या निर्देशांकामध्ये 1-1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Today’s stock market sensex nifty share price details)

बर्गर किंगला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट

एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, टायटनसारख्या कंपन्यांचे शेअर्स मुंबई शेअर बजारात 52 आठवड्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले. बर्गर किंगसह जवळपास 300 कंपन्यांच्या शेअर्सना अप्पर सर्कीट लागले आहे. बर्गर किंगच्या शेअरची किंमत 199 रुपयांवर पोहोचली असून बर्गर किंगला 20 टक्क्यांनी अपर सर्कीट लागले आहे. मंगळवारीसुद्धा या कंपनीच्या शेअर्सला 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते.

संबंधित बातम्या :

Gold silver rate today | जळगाव सराफ बाजारात सोन्याला झळाळी, तोळ्याचा दर…

मनी ऑर्डरचे युग संपले; आता DakPay अ‍ॅपने पाठवा तात्काळ पैसे

पहिल्याच दिवशी ‘या’ कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद

(Today’s stock market sensex nifty share price details)