ट्रेन कॅन्सल झाली तर तिकीटाचं काय होतं, कसा मिळतो रिफंड ? जाणून घ्या प्रोसेस
रेल्वेने 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन स्टेशनवर येणाऱ्या सर्व मेल आणि एक्सप्रेस ट्रेन रद्द केल्या आहेत. कोणताही कपात न करता पूर्ण पैसे परत मिळतील.

भारतीय रेल्वेने, उद्या 10 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 पासून ते दुपारी 2 पर्यंत नई दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेलवे स्टेशन ला येणाऱ्या सर्व मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन रद्द केल्या आहेत. सीजेपीचं उद्या, जंतरमंतर येथे आंदोलन होणार असून, त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे, रेल्वेतर्फे संबंधित प्रवाशांना मेसेज पाठवून या निर्णयाची माहिती देण्यात आली. रेल्वेच्या माहितीनुसार, दोन्ही स्टेशन्सवर दररोज सुमारे 75 हजार प्रवासी येतात- जातात. मात्र एखादी ट्रेन कॅ्सल झाली तर त्या ट्रेनच्या तिकीटाचं काय होतं ? रिफंड कसा मिळतो आणि त्याची प्रोसेस कशी असते ?
जर एखादी ट्रेन ही रेल्वेतर्फे पूर्णपण रद्द करण्यात आली, तर प्रवाशांना तिकीटाचे पूर्ण पैसे दिले जातात. अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे कॅचार्जेस किंवा क्लर्कस चार्जेस हे कापले जात नाहीत. मात्र, ट्रेनचं तिकीट हे ऑनलाइन बूक करण्यात आलं होतं की रेल्वे काऊंटवरून विकत घेण्यात आलं, यावर रिफंड मिळवण्याचा मार्ग अवलंबून असतो.
1. ऑनलाइन ई-तिकीटाचा रिफंड कसं मिळणार ?
जर तुम्ही IRCTC ची वेबसाइट किंवा ॲपवरून तिकीट बुक केलं असेल आणि ट्रेन पूर्णपणे रद्द झाली असेल, तर तुम्हाला तिकीट रद्द करण्याची किंवा रिफंडसाठी वेगळा अर्ज करण्याची गरज नाही. रेल्वेच्या व्यवस्थेनुसार तिकीट आपोआप रद्द होतं आणि रिफंडची प्रक्रिया सुरू होते. तिकीट बुक करताना जे बँक खातं, क्रेडिट कार्ड किंवा UPI वापरलं गेलं असेल, सहसा त्याच मार्गातून (प्रवाशांना) पैसे परत मिळतात. रिफंड येण्यासाठी काही दिवस लागू शकतात. तरीही, प्रत्यक्ष पैसे येण्याचा वेळ हा पेमेंट माध्यम आणि रेल्वेच्या प्रक्रियेनुसार अवलंबून असतो.
2. काऊंटरवरून तिकीट घेतलं असेल तर –
जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या रिझर्व्हेशन काउंटवरून तिकीट घेतलं असेल, तर रिफंड मिळवण्यासाठी नियमांनुसार तुम्हाला ते तिकीट रेल्वे काउंटवर जमा करावं लागतं. पूर्णपणे रद्द झालेल्या ट्रेनच्या तिकिटाचा रिफंड घेण्यासाठी सहसा ट्रेनच्या निर्धारित प्रस्थान (निघण्याची वेळ) – वेळेच्या 72 तासांच्या आत तिकीट जमा करावे लागते. त्यानंतर रेल्वेच्या नियमांनुसार रिफंड दिला जातो.
3. ट्रेन अंशत: रद्द झाली किंवा मार्ग बदलला तर काय करावं ?
जर ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला असेल, किंवा ट्रेन मधल्या एखाद्या स्थानकावरच थांबवली असेल किंवा तिच्या प्रवासाचा काही भाग रद्द करण्यात आला असेल, तर रिफंड मिळवण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. अशा परिस्थितीत पात्रता आणि लागू नियमांनुसार ऑनलाइन तिकिटासाठी TDR दाखल करावा लागू शकतो. TDR किती वेळेत दाखल करायचा, हे परिस्थिती आणि रेल्वेच्या संबंधित नियमांवर अवलंबून असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी IRCTC किंवा रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर लागू असलेली मुदत तपासून घ्या.
जर ट्रेन रद्द होऊनही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर तुम्ही 139 या रेल्वेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधु शकतात किंवा रेल्वे मदत पोर्टलवर मदत तक्रार दाखल करू शकता.
