AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार? सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार? महत्त्वाची अपडेट समोर!

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये महागाई भत्त्याबाबात कोणताही निर्णय झाला नाही. २१ ऑक्टोबर रोजी ही बैठक पार पडली होती. पण निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा वाढली आहे. आता पुढची बैठक २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार? सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार? महत्त्वाची अपडेट समोर!
DA hikeImage Credit source: social media
| Updated on: Oct 24, 2026 | 3:53 PM
Share

केंद्र सरकारकडून जुलै २०२६ साठी महागाई भत्ता म्हणजेच डीएची घोषणा अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाही. गेल्या दोन बैठकांमध्ये यासंदर्भातील निर्णय येणे अपेक्षित होते पण तसे न झाल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. याआधी १४ आणि २१ ऑक्टोबर रोजी बैठका झाल्या पण त्यामध्येही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांवर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सरकारकडून १६ ऑक्टोबर रोजी नॉन परफॉर्मन्स लिंक्ड बोनस जाहीर केला गेला आहे पण डीएबद्दल मात्र कोणतीही अपडेट दिलेली नाही.

दरम्यान, आता शनिवार-रविवार असल्याने याबद्दल कोणत्याही निर्णय येण्याची शक्यता कमी आहे.जर आज किंवा उद्या याबद्दल कोणताही निर्णय आला नाही तर बुधवारपर्यंत अपडेट येण्याची शक्यताही कमी आहे. कारण बुधवारी साप्ताहिक बैठक २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पुढच्या बैठकीपर्यंत प्रतिक्षा?

सरकारकडून प्रत्येक बैठकीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या जातात. परंतू डीए आणि डीआरचा परिणाम एक कोटींपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी पेंशनधारकांवर होतो, त्यामुळे सरकार मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सर्व गोष्टींची खातरजमा करुनच बैठकीनंतर निर्णयाची घोषणा करतं. त्यामुळे आता पुढील बैठक २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये सरकार डीए वाढी संदर्भातली घोषणा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, केवळ बैठकीनंतरच निर्णय घेतला जाईल, असा कोणताही बंधनकारक नियम नाही. अर्थ मंत्रालयाच्या विभाग मंत्रिमंडळाच्या घोषणेची वाट न पाहता महागाई भत्त्यातील वाढ जाहीर करु शकतो. दिवाळी तोंडावर असताना यासंदर्भातील निर्णयाची कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.

डीएमध्ये किती वाढ होऊ शकते?

अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार यावेळी महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ होण्याची श्कत्या आहे. सध्या महाराई भत्ता ६० टक्के आहे. सरकारने तीन टक्क्यांची वाढ केल्यानंतर तो ६३ टक्के होईल आणि सर्वात महत्तावेच म्हणजे डीएवाढची घोषणा कधीही होवो पण तो जुलै २०२६ पासून लागू होणार आहे. याचा अर्थ असा की, कर्मचारी आणि पेन्शनवेतनधारकांना त्यांची मागील थकबाकीही एकाच वेळी परत दिली जाईल.

Follow Us
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...
एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं....
Manoj Jarange On Viral Clip : एकनाथ शिंदेंच्या मुलांना पैसे दिले, हे रामदास कदमांनीच सांगितलं; जरांगेंचा दावा, महायुतीत पुन्हा खळबळ
हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला
Prasad Lad On Sanjay Raut : हाथी चले बाजार, कुत्ते भोंके हजार! प्रसाद लाड यांचा संजय राऊतांना टोला; ऑडिओ क्लिपवरून राजकीय घमासान
500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Jarnage Viral Audio Clip : 500 कोटींची ऑडिओ टेप भाजपच्या आमदारानं फोडली संजय राऊतांचा गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या..
Pankaj Bhoyar : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिप्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू; 500 कोटींच्या आरोपांमागचं सत्य लवकरच समोर येणार?