Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदा 376 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या 376 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

Bank of Baroda Recruitment 2021: बँक ऑफ बडोदा 376 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
job
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 12:34 PM

मुंबई : बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या 376 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. बँक ऑफ बडोदा बँकेतील पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. तर, अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

बँक ऑफ बडोदामध्ये सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर आणि ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या भरतीसाठी भारत सरकारनं मान्यता दिलेल्या विद्यापीठातून उमेदवार पदवी उत्तीर्ण असावा. तर, पदनिहाय अधिक शैक्षणिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेनं प्रसिद्ध केलेली जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. सीनिअर रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी किमान 3 तर ई-वेल्थ रिलेनशिप मॅनेजर पदासाठी दीड वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अर्जाचं शुल्क

बँक ऑफ बडोदाकडून खुल्या आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्जाचं शुल्क 60 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवार, महिला आणि दिव्यांग उमेदवारांना 100 रुपये अर्जाचं शुल्क द्यावं लागेल.

ऑनलाईन अर्ज कुठं दाखल करायचा?

पात्र उमेदवारांनी बँक ऑफ बडोदामध्ये पदाच्या भरतीसाठी https://www.bankofbaroda.in/ या वेबसाईटवर अर्ज करावेत.

सेंट्रल बँकेत 115 जागांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकतात. सेंट्रल बँकेतील पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर आहे. तर, अर्ज दाखल करण्यास 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून इकॉनॉमिस्ट, इनकम टॅक्स ऑफिसर,इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, डेटा सायंटिस्ट,क्रेडिट ऑफिसर,डेटा इंजिनिअर, आयटी सिक्युरिटी अनॅलिस्ट, आयटी एसओसी अनॅलिस्ट, रिस्क मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट), फायनांशियल अनॅलिस्ट, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, लॉ ऑफिसर, रिस्क मॅनेजर, सिक्युरिटी ऑफिसर अशा पदासांठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

इतर बातम्या:

Bank Recruitment 2021: सेंट्रल बँकेत स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या 115 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

Bank of Barora Recruitment 2021 invites Applications for the 376 post check details here

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.