AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?

एलआयसीनं विमा सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एलआयसीनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 100 जागांवर भरती होणार आहे.

LIC Recruitment 2021: एलआयसीमध्ये विमा सल्लागार पदाच्या 100 जागांवर भरती, अर्ज कुठे करायचा?
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 4:58 PM
Share

मुंबई: भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं विमा सल्लागार पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एलआयसीनं त्यांच्या वेबसाईटवर जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं 100 जागांवर भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://licindia.in/ वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज कधी आणि कुठे करावा?

भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार https://licindia.in/ या वेबसाईटवर 31 डिसेंबरपर्यंत पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांनी एलआयसीच्या वेबसाईटवर नोंदणी करुन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

100 जागांसाठी भरती

एलआयसीच्या लोक प्रशासन आणि संरक्षण विभागातील विमा सल्लागार पदासाठी 100 जागांवर भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथील कार्यालायत नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

पात्रता

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवार भारत सरकार मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असावा. निवड झाल्यानंतर त्याला मार्केटिंग आणि सेल्समध्ये काम करावं लागेल.

वेतन

एलआयसीकडून विमा सल्लागार म्हणून निवड होणाऱ्या उमदेवारांना 7 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान मानधन दिलं जाणार आहे. एलआयसीच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन वाचून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

नाल्कोमध्ये 86 जागांवर भरती

नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर पदांवर मध्ये नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. नाल्कोच्यावतीनं पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाईट nalcoindia.com वर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.

नाल्कोमध्ये नॅशनल अॅल्युमिनिअर कंपनी लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर, जनरल मॅनेजर, ग्रुप जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजरच्या 86 पदांवर अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 07 डिसेंबर 2021 निश्चित करण्यात आलेली आहे. मुदतीनंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं नाल्कोकडून कळवण्यात आलं आहे. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन वाचावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

संबंधित बातम्या:

MPSC Update: सरकारकडून एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु, दत्तात्रय भरणेंची माहिती

Nalco Recruitment 2021: नाल्कोमध्ये अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी, 60 हजार ते 2 लाखांपर्यंत पगार

LIC Recruitment 2021 Applications invited for 100 Insurance Advisor posts

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.