MPSC Update: सरकारकडून एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु, दत्तात्रय भरणेंची माहिती

राज्य सरकारनं एमपीएससीला 7 हजार 168 पदांसाठी एमपीएससीला मागणीपत्र दिल असल्यानं एमपीएससीतर्फे विविध विभागातील पदांची भरती लवकरचं केली जाईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

MPSC Update: सरकारकडून एमपीएससीला 7168 पदांसाठी मागणीपत्र, लवकरच भरती प्रक्रिया सुरु,  दत्तात्रय भरणेंची माहिती
MPSC EXAM


पुणे : राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य सरकारनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारनं एमपीएससीला 7 हजार 168 पदांसाठी एमपीएससीला मागणीपत्र दिल असल्यानं एमपीएससीतर्फे विविध विभागातील पदांची भरती लवकरच केली जाईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

गट निहाय तपशील

राज्य सरकारनं गट अ पदांसाठी 2 हजार 827 , गट ब साठी 2641 जागा , गट क साठी 1700 जागा अशा एकूण 7 हजार 168 पदांच मागणीपत्र एमपीएससीला दिलं आहे. एमपीएससीला राज्य सरकारचं मागतीपत्र प्राप्त असून पुढील प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

राज्य सरकारनं गट अ, गट ब आणि गट क प्रवर्गातील पदांसाठीचं मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे दिलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून येत्या काही दिवसामध्ये 7 हजार 168 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि इतर कारणांमुळं भरती प्रक्रिया रखडली होती. आता एकूण 7 हजार 168 पदांसाठी मागणीपत्र दिल्यानं नोकरीसाठी परीक्षांची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुवर्णसंधी असणार आहे.

वयोमर्यादा परिपत्रक लवकरचं जाहीर होणार

राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आयोजित करता न आल्यानं वयोमर्यादा एका वर्षानं वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता. त्यासंदर्भातील परिपत्रक लवकरचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर केलं जाईल, असं देखील दत्तात्रय भरणे म्हणाले आहेत.

वयोमर्यादा वाढल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा

कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. विविध संवर्गाच्या जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं वयोमर्यादा वाढवून द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. खासदार संभाजी छत्रपती यांनी देखील विद्यार्थ्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली होती. राज्य सरकारच्या निर्णयानंतर एमपीएससीकडून परिपत्रक जाहीर झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

इतर बातम्या:

दिलासादायक बातमी ! स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे महापालिका सुरु करणार ‘मोफत कोचिंग सेंटर’

MPSC Exam Update: वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वाढवून मिळणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI