AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत 12 जागांवर भरती, 30 ते 60 हजारांपर्यंत पगाराची संधी

भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत आरोग्य विभागात 12 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ आणि वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत 12 जागांवर भरती, 30 ते 60 हजारांपर्यंत पगाराची संधी
Jobs
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 11:31 AM
Share

भिवंडी: भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत आरोग्य विभागात 12 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ आणि वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकतात.ही पदं राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत असल्यानं त्याचा महापालिकेशी संबंध असणार नाही, असं पालिकेकडून कळवण्यात आलं आहे.

26 नोव्हेंबरला मुलाखतीचं आयोजन

भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत आरोग्य विभागात 12 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीपदाच्या तीन जागा भरल्या जाणार आहेत. तर, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या 9 जागांवर भरती करण्यात येत आहे. या पदांसाठी अर्ज 27 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदाच्या पात्रतेतील निकषांच्या आधारे गुण निश्चित करुन उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचावी, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झालेल्या उमदेवाराला 60 हजार तर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदावरील उमदेवाराला 30 हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे. उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे.

कंत्राटी तत्त्वावर निवड:

भिवंडी निझामपूर शहर महापालिकेत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत 12 पदांची भरती करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमबीबीएस पदवी असणं आवश्यक आहे. यशिवाय सरकारी आणि खासगी संस्थेतील अनुभव असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या:

उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!

धक्कादायकः पोटच्या पोरीलाच प्रियकराच्या हवाली केलं, औरंगाबादेत आईसह आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल

Bhivandi Nizampur Shahar Municipal Corporation invites application for 12 Medical Officer

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.