मौनी रॉय (Mouni Roy) अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांची जोरदार चर्चा आहे. ती तिच्या दुबईस्थित प्रियकराशी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
Nov 25, 2021 | 11:03 AM
मौनी रॉय (Mouni Roy) अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाच्या बातम्यांची जोरदार चर्चा आहे. ती तिच्या दुबईस्थित प्रियकराशी लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे.
1 / 5
मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत असते. आता अभिनेत्रीने तिचे बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती धमाल करताना दिसत आहे.
2 / 5
बाथरोब घातलेले तिचे फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जागे व्हा, मेकअप करा, काम करा.’
3 / 5
मौनी रॉय सध्या दुबईमध्ये आहे आणि काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, ती दुबईस्थित एका बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, मौनीचा बॉयफ्रेंड दुबईमध्ये राहतो आणि आता दोघांनाही त्यांच्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे न्यायचे आहे.
4 / 5
मौनीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच 'वेल्ली' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनीसोबत अभय देओल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.