AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत उलगडणार नवा अध्याय; नव्या कलाकारांची एण्ट्री

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेच्या आगामी भागात नवा अध्याय उलगडणार आहे. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची पहिली पायरी कथेत पुढे पहायला मिळणार आहे. यासाठी दोन नव्या कलाकारांची मालिकेत एण्ट्री झाली आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 12:35 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चिमुकली सावित्री आणि जोतीराव यांचा बालपणातील प्रवास, त्यांचा विवाहसोहळा, फुलेवाड्यातील प्रसंग, सावित्रीबाईंचे सासरच्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न आणि जोतीरावांची शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड या सर्व टप्प्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.

1 / 5
आता ही मालिका एका महत्त्वाच्या वळणावर येत आहे. लवकरच प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या टप्प्यात समाजातील रूढी-परंपरांची आव्हानं आणि सावित्रीबाईंनी शिकावं, स्वावलंबी व्हावं यासाठी जोतीरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत.

2 / 5
सावित्रीबाईंना शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी जोतीरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडण्याचं धैर्य वाखाणण्याजोगं आहे. नव्या पीढीसाठी मालिकेतलं हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहेत.

3 / 5
त्यांच्या प्रभावी अभिनयातून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी कथा अधिक सशक्तपणे उलगडताना दिसणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री राजसी भावे म्हणाली, "मालिकेत सावित्रीबाईंचं बालपण साकारत असलेल्या तक्षा शेट्टीने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. त्यामुळे तिच्याकडून खूप गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतेय. ही भूमिका फार मनाच्या जवळची आहे. थोड्या काळासाठी का होईना ती साकारायला मिळणं पर्वणी आहे माझ्यासाठी."

4 / 5
अभिनेता अभिषेक देशमुख म्हणाला, "इतकं महान व्यक्तिमत्त्व साकारायला मिळतंय याचा आनंद गगनात मावत नाहीये. मी या मालिकेचा मोठा चाहता आहे. पहिल्या एपिसोडपासून ही मालिका मी न चुकता पाहतोय. मालिकेची कथा खूप अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्वक लिहिलेली आहे. त्यामुळे जेव्हा जोतीरावांच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा वेगळा अभ्यास करावा लागला नाही. मालिकेच्या कथेतूनच माझा सराव आणि अभ्यास झाला."

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...