AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका नुकतीच पार पडली आणि आयसीसी वनडे क्रमवारीही जाहीर झाली. या क्रमवारीत शुबन गिलचं अव्वल स्थान अवघ्या एका गुणाने हुकलं. इंग्लंडविरुद्ध मालिकेत सर्वाधिक धावा केल्या, पण अव्वल स्थानासाठी इतक्या धावा कमी पडल्या.

ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान
ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसानImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 22, 2026 | 7:11 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला 1-2 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मालिकेतील पराभवानंतर आता आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात कर्णधार शुबमन गिलचं अव्वल स्थान अवघ्या एका धावेने हुकलं आहे. त्याला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. कर्णधार शुबमन गिलने वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. पण असूनही त्याला अव्वल स्थान काही गाठता आलं नाही. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचं 801 इतकं गुणांकन आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल 802 गुणांकनासह अव्वल स्थानी आहे. शुबमन गिलने या मालिकेत धावा करूनही त्याचं नुकसान झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर त्याचं गुणांकन 803 होतं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेनंतर यात 2 गुणांची घसरण झाली आणि गुणांकन 801 झालं.

शुबमन गिलला धावा करून बसला फटका

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील 3 सामन्यात 94 च्या सरासरीने 188 धावा केल्या. त्यात तीन सामन्यापैकी दोन सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 80, दुसऱ्या सामन्यात 31 आणि तिसऱ्या सामन्यात 77 धावांची खेळी केली. लॉर्ड्सवरील शेवटच्या वनडे सामन्यात शुबमन गिलने 77 धावांवर बाद झाला. खरं तर या सामन्यात त्याने आणखी 15 ते 20 धावा केल्या असत्या तर चित्र काही वेगळं असतं. शुबमन गिल 95 किंवा शतकी खेळी करून बाद झाला असता तर त्याला 2 ते 3 गुण अधिकचे मिळाले असते आणि अव्वल स्थानी पोहोचला असता.

मालिका पराभवामुळे असं नुकसान

आयसीसी नियमानुसार, खेळाडूने वैयक्तिक कितीही धावा केल्या तर संघाच्या कामगिरीचाही परिणाम होतो. कारण सामना किंवा मालिका जिंकली की हरली यावर त्याचं वेटेज ठरतं. भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका 1-2 ने गमावली. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम दिसून आला. जर ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली असतील तर शुबमन गिलने 802चं गुणांकन पार केलं असतं.जर भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका 3-0 किंवा 2-1 अशी जिंकली असती, तर गिलला त्याच्या 188 धावा आणि मालिका विजयाचे मिळून 35 गुण मिळाले असते. तो सहज 806 गुणांवर गेला असता. पण मालिका गमावल्याने 188 धावा करूनही केवळ 29 गुण मिळाले. तसेच 801 गुणांकनावरच थांबला.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?