AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटी नको तेच घडलं! इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ पुण्यापर्यंत, सरकारकडून खबरदारीचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यामध्ये वाढत असलेल्या तणावामुळे जगावर परिणाम होत आहे. आता थेट या युद्धाची झळ महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचली आहे. सरकारकडून खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत.

शेवटी नको तेच घडलं! इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ पुण्यापर्यंत, सरकारकडून खबरदारीचे आदेश
Iran and Israel warImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 06, 2026 | 12:32 PM
Share

गेल्या सात दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिका एकत्रितपणे इराणवर हल्ला करत आहेत. आता हे युद्ध टोकाला पोहोचत आहे. सतत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण पाहायला मिळत आहे. या युद्धात इराणचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जवळपास 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या तीन देशांमध्ये सुरु असलेल्या देशाचा जगावर परिणाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होत आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया…

इराण हा जगातील प्रमुख तेल आणि गॅस उत्पादक देशांपैकी एक आहे. युद्ध अधिक तीव्र झाल्यास, तेल-गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते. याचा थेट परिणाम कच्च्या तेल आणि एलपीजी (LPG) किमतींवर होतो, ज्याच्या झळा आता भारतात जाणवू लागल्या आहेत. विशेषतः महाराष्ट्रात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा प्रभावित झाला आहे.

महाराष्ट्रात व्यावसायिक गॅस पुरवठा थांबला

युद्धामुळे मध्य पूर्वेतील पुरवठा प्रभावित झाल्याने, पुण्यात व्यावसायिक (कमर्शियल) एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बुधवारपासून (५ मार्च २०२६) थांबवण्यात आला आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीसीएलच्या शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएलच्या चाकण प्लांटमध्ये व्यावसायिक सिलेंडर भरून देणे बंद करण्यात आले आहे. डीलर्सना सूचना देण्यात आली आहे की, व्यावसायिक सिलेंडरसाठी गाड्या पाठवू नयेत. पुढील आदेश येईपर्यंत थांबा.

तेल कंपन्यांचा डीलर्सना मेसेज

“प्रिय डीलर्स, युद्धजन्य परिस्थितीमुळे कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात येत आहे. सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. परिस्थिती सुधारली की त्वरित कळवले जाईल” असे सांगण्यात आले आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडर मुख्यतः कुठे वापरले जातात?

-हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे, धाबे आणि केटरिंग सर्व्हिसेस

-बेकरी, मिठाई दुकाने

-हॉस्पिटल्स आणि ऑफिस कँटीन

-सेरॅमिक्स, वस्त्रोद्योग, धातू वितळवणारे कारखाने, पावडर कोटिंग युनिट्स इ.

युद्धाचे मुख्य कारण काय?

२०२५ मध्ये इराण-इस्रायल संघर्ष आणि इराण-समर्थित गटांशी झालेल्या घटनांमुळे इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेवर वारंवार इशारे दिले होते. इराणने मात्र हे इशारे फेटाळले आणि आपला अण्वस्त्र-संबंधित कार्यक्रम सुरू ठेवला. अखेर, इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानसह विविध ठिकाणी हल्ले चढवले, ज्यामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला. यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या झाल्याचेही अहवाल आहेत.

सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घरगुती गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण युद्ध कालावधी वाढल्यास किमती आणि पुरवठ्यात अधिक अडचणी येऊ शकतात. परिसरातील लोक आणि व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी सूचना दिली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...