Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यावर प्रचंड नाराजी, धडाकेबाज कारवाई करूनही..
आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यभरात भेसळखोरांविरोधात कारवाई केली जात आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांच्यावर फार्मासिस्टांनी मोठी नाराजी व्यक्त केली. तुकाराम मुंढे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी म्हटले.

अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे काैतुक देशभरात होत आहे. भेसळखोरांविरोधात त्यांनी मोर्चा वळवला. लोकांमध्ये तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळतंय. मात्र, आता तुकाराम मुंढे यांच्याविरोधात फार्मासिस्ट नाराज झालेत. फार्मासिस्टांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधातील नाराजी जाहीर केली. त्यांनी म्हटले की, तुकाराम मुंढे यांच्याकडून ऑनलाईन औषध विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे. ई फार्मसी आणि ऑनलाईन औषध विक्री राज्यात जोरदार होत आहे. बेकायदेशीरपणे हा सर्व कारभार सुरू आहे. मात्र, अन्न आणि औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. याच्याकडे त्यांचे अजिबातच लक्ष नाही. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मेडिकल दुकानांवर फार्मसिस्ट नसल्यास थेट परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पण दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांसमोरच बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात औषधांची ऑनलाईन विक्री ही होत आहे, पण त्यावर कोणाचाही वचक नाही. तुकाराम मुंढे याकरिता नक्की का दुर्लक्ष करत असल्याचा सवालही त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने औषध विक्री करणाऱ्यांना कोणतेही नियम नाहीत. सर्व नियम आम्हालाच का? हेच नाही तर त्यांच्याकडून डॉक्टरांची चिठ्ठी नसतानाही विक्री होते.
बंर ते ठीक आहे पण थेट या औषधांची गुणवत्ता आणि त्याच्या तपासण्या कोण करणार? अल्पवयीन मुलेही त्याची विक्री करू शकतात. गर्भपाताच्या गोळ्याही सर्रासपणे विक्री केल्या जातात. या औषधांचा गैरवापर केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. कोण कोणत्या प्रकारे आणि कशासाठी ही औषधे मागवत आहेत, याचा कोणताही रेकार्ड हा ठेवला जात नाही.
तुकाराम मुंढे यांच्याकडून अनेक अस्थापनांवर कारवाई केली जात आहे. त्यांनी महाप्रसादावरही काही नियम लागू केले. पण फार्मासिस्टांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नाराजी जाहीर केली. यावर आता तुकाराम मुंढे नक्की काय कारवाई करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. औषध विक्रेत्यांकडून मागील काही दिवसांपासून सातत्याने ऑनलाईन औषध विक्रीला जोरदार विरोध केला जात आहे.
