Maharashtra Budget 2026 LIVE: आज फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प, कर्जमाफीसह लाडक्या बहिणींना कोणते गिफ्ट? महाराष्ट्राचे महानिर्णय कोणते?
Maharashtra Budget 2026 LIVE Updates in Marathi: आज मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. बहुप्रतिक्षीत शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ याविषयीची घोषणा या अर्थसंकल्पात करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आज अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होणार?

LIVE NEWS & UPDATES
-
केडीएमटीचा हा कसला न्याय? २० रुपयांच्या बससाठी ४० रुपयांचा रिक्षा प्रवास
डोंबिवली स्वामीनारायण सिटी–ठाणे माजिवडा २० रुपयांत बस सेवा, मात्र बस सेवा स्टेशनपासून दूर असल्याने प्रवासी नाराज. बस पकडण्यासाठी आधी ४० रुपयांचा रिक्षा प्रवास; प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया. बस सेवा ‘श्रीमंत वसाहतीं’साठीच सुरू केली का? सर्वसामान्य डोंबिवलीकर व नागरिकांना या बस चा फायदा काय संतप्त प्रवाशांचा प्रशासनाला सवाल. बस सेवा थेट डोंबिवली रेल्वे स्थानकावरून सुरू करा प्रवाशांची जोरदार मागणी
-
अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल सिद्धीविनायक गणपती दर्शन घेणार
अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल साडे नऊ वाजता सिद्धिविनायकचे दर्शन घेणार आहेत. अतूल सावे देखील सिद्धीविनायक मंदिरात पोहोचले आहेत.
-
-
शाळेत सोडण्याच्या बहाण्याने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भुसावळ नशिराबाद रस्त्यावर निर्जन स्थळी घेऊन जात मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे…
-
मंत्री अतुल सावे यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी घेतले सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन. आपल राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत. सिद्धिविनायकांच्या दर्शना नंतर मंत्री अतुल सावे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनीधी विजय गायकवाड यांनी
-
जळगावात भारत फायनान्स या खासगी बँकेच्या जळगाव शाखेत आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस
३३६ महिलांच्या ३१ लाख १२ हजार १६४ रुपयांचा फसवणूकप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांनी ३३६ कर्जदार महिलांकडून हप्ते गोळा करून ती रक्कम बँकेत भरण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे पोलिसात दाखल तक्रारीत नमूद. बँकेच्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये हिशेबात वसुली झालेली रक्कम आणि बँकेत जमा झालेली रक्कम यात मोठी तफावत आढळून प्रकार उघडकीस. शाखा व्यवस्थापक मनीष चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेच्या ५ माजी वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, ते आता तपास करणार आहे
-
-
अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित
मुख्यमंत्री आणि वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस अगदी थोड्याचवेळात अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात अजितदादां सारखीच कडक आर्थिक शिस्त दिसून येण्याची शक्यता आहे. काल सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे.
-
थेट परकीय गुंतवणूक वाढली
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 31 टक्के इतका आहे. तर स्टार्टअप क्षेत्रातही राज्याचा देशात सर्वाधिक म्हणजे 17 टक्के इतका वाटा आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार थेट परकीय गुंतवणुकीतही राज्याने मोठी आघाडी घेतली आहे.
-
-
अनेक संकटं असली तरी मुख्यमंत्री सक्षम-अतुल सावे
राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी सिद्धिविनायक मंदिरात गणरायाचे दर्शन घेतले. आपलं राज्य चांगले चालले पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत ते सर्वासाठी असले पाहिजे. राज्यात अनेक संकट जरी असले तरी मुख्यमंत्री सक्षम आहेत हे सर्व दूर करण्यास अशा भावना अतुल सावे यांनी व्यक्त केल्या आहेत.
-
पायाभूत सुविधा विकासाला चालना
राज्याच्या पायाभूत सोयी-सुविधांना गती मिळणार आहे. त्यासाठी विविध विकास योजना राबवण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो प्रकल्पासह बंदरे विकास, विमानतळ आणि औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे.
-
अर्थव्यवस्थेची जोरदार घौडदोड
विधानसभेत वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तर विधान परिषदेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 सादर केला. या अहवालात कृषी,उद्योग आणि सेवा क्षेत्रातील वाढीमुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचा दावा केला आहे.
-
लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ?
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी अनेकदा लाडक्या बहिणी योजनेचे मानधन 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्यासाठी काही ठोस आश्वासन देण्यात येणार का याची उत्सुकता लागलेली आहे.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार आज अर्थसंकल्प
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज, शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडतील. कर्जाचा बोजा आणि महसूली तूट भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तर लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ होणार का याकडेही लक्ष लागले आहे.
महायुती सरकार आज शुक्रवारी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करणार आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय घडामोडींमुळे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडतील. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांच्याकडे वित्त खात्याची जबाबादारी आली आहे. वर्ष 2026-2027 अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफीची डेडलाईन आता जवळ आली आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने जून च्या आसपास कर्जमाफी करण्याविषयीचे आश्वासन दिले होते. आजच्या अर्थसंकल्पात याविषयीची काही घोषणा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर लाडक्या बहिणींचा हप्ता 1500 रुपयांहून 2100 रुपये करण्यात येणार का, याकडेही राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. तर उद्योग जगतासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकताच दावोस दौरा केला. त्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी अजून काही सवलती मिळतील का याकडे उद्योगजगताचे लक्ष लागले आहे. तर राज्याची महसूली तूट भरुन काढण्यासाठी आणि कर्जाचा वाढता डोलारा कमी करण्यासाठी खर्चात कमी करण्याचे अस्त्र राज्य सरकार बाहेर काढणार का याविषयीची चर्चा रंगली आहे.
Published On - Mar 06,2026 8:08 AM
