Sanjay Raut | राजकारणात पैशाची चटक वाढवू नका; राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊतांचे वक्तव्य
निवडणुकीची गरज नसताना अनावश्यक घोडेबाजार करण्याला काहीही अर्थ नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करू नये, अशी आपली भूमिका असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवडून आल्याची केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीची गरज नसताना अनावश्यक घोडेबाजार करण्याला काहीही अर्थ नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करू नये, अशी आपली भूमिका असल्याचेही राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीकडे दोन विधानपरिषद आणि एक राज्यसभा सदस्य निवडून देण्याइतके संख्याबळ असल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला. मात्र काहींना घोडेबाजार करून राजकारणात पैशाचा प्रभाव वाढवायचा असेल, तर ते राज्याच्या प्रतिष्ठेला आणि इभ्रतीला धक्का देणारे ठरेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Published on: Mar 06, 2026 12:24 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

