सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस भरती, ४ हजारांहून अधिक पदे भरली जाणार, असा करा अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस भरती, ४ हजारांहून अधिक पदे भरली जाणार, असा करा अर्ज
Central Bank Of India
| Updated on: Jun 08, 2025 | 9:57 PM

बँकेत नोकरी करण्याच्या विचारात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून २०२५ आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी शुल्क भरण्याची शेवटची तारीख २५ जून २०२५ आहे. अर्ज भरल्यानंतर ऑनलाइन परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे.

अप्रेंटिस पदांसाठी पात्रता काय?

सेंट्रल बँक ऑफ इंडियातील ४५०० अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारत सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असने आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड कशी होणार ?

अप्रेंटिस पदांसाठीच्या निवड प्रक्रियेसाठी BFSI SSC द्वारे आयोजित केली जाणारी ऑनलाइन परीक्षा आणि राज्याच्या स्थानिक भाषेत चाचणी पास होणे गरजेचे आहे. ऑनलाइन परिक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे या परीक्षेत चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही.उमेदवारांनी परीक्षा पास केल्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल आणि त्यानंतर उमेदवारांना सरकारी अप्रेंटिसशिप दिली जाईल.

अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹४००/-+GST आहे. SC/ST/सर्व महिला उमेदवार/EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी, अर्ज शुल्क ₹६००/- + GST ​​आहे आणि ओपन आणि इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹८००/- + GST ​​आहे. यासाठी पेमेंट ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.