
नवी दिल्ली: जर तुम्हाला टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी व्हायचं असेल, चांगली नोकरी हवी असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदांची भरती सुरु करण्यात आलीये. तुम्ही जर या नोकरीसाठी इच्छुक असाल तर अधिकृत वेबसाईवर जाऊन अधिक माहिती वाचू शकता. या नोकरीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे, नोकरीच्या अटी काय आहेत, भरती प्रक्रिया कशी आहे हे सगळं आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
टेरिटोरियल आर्मीच्या या नोकरीसाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेलं चालणार आहे फक्त तुमची पदवी एखाद्या मान्यता असणाऱ्या संस्थेतून असावी. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा – jointerritorialarmy.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे यावर तुम्हाला अधिकृत माहिती मिळेल. 18 ते 42 वर्षे अशी वयोमर्यादा आहे. बघुयात कोणत्या पदासाठी किती पगार आहे. पगारासोबतच उमेदवाराला अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचा ही लाभ दिला जाणार आहे.
अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. यात 100 गुणांचा पेपर असेल आणि त्यासाठी 100 प्रश्न विचारले जातील. परीक्षेत रिझनिंग मॅथेमॅटिक्स, जनरल नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज असे’विषय असतील आणि त्यावर प्रश्न विचारले जातील. परीक्षेत जे गुण मिळतील त्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी असेल. अर्ज शुल्क भरावा लागणार आहेत.
Territorial Army Recruitment Notification 2023 या लिंकवर क्लिक करा