EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?

| Updated on: Mar 04, 2021 | 12:53 PM

ssc hsc exam 2021 final timetable : दहावी बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे, मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत  आहेत. 

EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?
Varsha Gaikwad
Follow us on

मुंबई : मार्च महिना उजाडला तरी दहावी बारावी बोर्ड परीक्षांबाबत (SSC HSC Exams 2021) कोणतीही ठोस घोषणा झाल्याचं दिसत नाही. दहावी बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे, मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत  आहेत.  याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) यांनी याप्रकरणी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad talks about SSC HSC Exam dates 2021)

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे”.

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

बोर्ड परीक्षा पॅटर्नबाबत मागणी केली जातीय ? याबाबत निर्णय घेणार ?

बोर्डाच्या परीक्षांबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र,पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात आणि पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पहिली ते आठवी विद्यार्थी परीक्षा

पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी, पुढील वर्गासाठी विद्यार्थ्यांचा यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या ऑनलाईन मुलं शिकत आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं, परीक्षेसंदर्भत आम्ही लवकर सांगू, असं वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं.

10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.  महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LIVE TV – 

संबंधित बातम्या 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास करण्याचा निर्णय जवळपास निश्चित !

(Maharashtra Education Minister Varsha Gaikwad talks about SSC HSC Exam dates and results 2021)