Railway Recruitment 2023 : रेल्वेत तरूणांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय थेट मिळवा नोकरी, 3000 हून अधिक व्हेकन्सी

रेल्वे विभागात नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. 3000 हून अधिक जागांसाठी ही भरती केली जाणार असून उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Railway Recruitment 2023 : रेल्वेत तरूणांसाठी बंपर भरती, परीक्षेशिवाय थेट मिळवा नोकरी, 3000 हून अधिक व्हेकन्सी
| Updated on: Dec 09, 2023 | 12:43 PM

Railway Recruitment 2023 : रेल्वे विभागात नोकरी करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण उत्तर रेल्वेने बंपर भरती जाहीर केली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), उत्तर रेल्वेने शिकाऊ पदांच्या (Apprentice) भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यामुविषळे थेट रेल्वे विभागात काम करण्याची अनोखी संधी तरूणांना मिळू शकते. विशेष म्हणजे विविध पदासांठी ही भरती केली जाणार आहे. 3000 हून अधिक जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

उत्तर रेल्वेतील विविध विभाग, युनिट आणि वर्कशॉपमध्ये ही भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट rrcnr.org द्वारे या रेल्वे नोकरीसाठी अर्ज करू शकतात. रेल्वे भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज 11 डिसेंबर 2023 ते 11 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 12 पर्यंत भरता येऊ शकतात. या भरती मोहिमेचे उद्दिष्ट उत्तर रेल्वेतील विविध विभाग/युनिट्स/वर्कशॉप्समध्ये एकूण 3093 शिकाऊ उमेदवारांची नियुक्ती करण्याचे आहे. त्यामुळे ज्यांना या कामात किंवा रेल्वेच्या विविध विभागात काम करण्यात रस आहे, त्यांनी वेळ न दवडता, तातडीने या पदांसाठी अर्ज दाखल करावेत.

वयोमर्यादा किती ?

रेल्वेतील या विभागातील पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी वयोमर्यादाही स्पष्ट करण्यात आली आहे. 11 जानेवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा जास्त आणि 24 वर्षांपेक्षा कमी असावे. म्हणजेच तुम्ही 15 ते 24 या वयोगटातील असाल तर तुम्ही या पदांसाठी सहज अर्ज करू शकता. दरम्यान राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत आहे.

शैक्षणिक योग्यता किती असावी ?
उमेदवारांनी किमान 50% गुणांसह मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

फी किती भरायची ?

रेल्वेच्या या भरतीसाठी, उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. हे फी पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना मात्र कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

कशी होणार निवड ?

शिकाऊ पदांसाठी (Apprentice) उमेदवारांची निवड ही अर्जांची छाननी आणि स्क्रूटनिंग यावर आधारित असेल. उमेदवरांची ही निवड कोणती परीक्षा आणि मुलाखतीशिवाय केली जाईल.

अर्ज कसा करावा ?

उत्तर रेल्वेने अद्याप भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. अधिकृत वेबसाइटवर भरतीसाठी लिंक तीन दिवसांनंतर म्हणजेच 11 डिसेंबर 2023 पासून सक्रिय होणार असून 11 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.