केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड, रेल्वे विभागात

Konkan Railway Jobs 2024 : सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज करावा. ही खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, परीक्षेचे नो टेन्शन, मुलाखतीमधून होणार निवड, रेल्वे विभागात
Railway
| Updated on: Jun 06, 2024 | 1:53 PM

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे परीक्षेचे अजिबातच टेन्शन भरतीसाठी नाहीये. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाईल. चला तर मग जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया अकरा पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे भरली जाणार आहेत. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता, ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता अशा पदांसाठी ही भरती सुरू आहे. चला तर मग लगेचच या भरतीसाठी अर्ज करा.

सिव्हिल इंजिनीअरिंग, डिप्लोमा, आयटीआय किंवा मान्यताप्राप्त विद्यापाठीतून पदवी घेतलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सीवूड्स रेल्वे स्टेशनजवळ, नवी मुंबई. या ठिकाणी उमेदवारांना मुलाखतीसाठी पोहचावे लागेल. उमेदवारांना मुलाखतीसाठी येताना आपले काही महत्वाचे कागदपत्रेही आपल्यासोबत ठेवावी लागणार आहेत. बाकी भरती प्रक्रियेबद्दलची माहिती आपल्याला konkanrailway.com या साईटवर मिळेल.

साधारण 15 जून 2024 ते 27 जून 2024 यादरम्यान मुलाखती पार पडणार आहेत. पदानुसार मुलाखतीची तारीख ठेवण्यात आलीये. त्यानुसार उमेदवारांना मुलाखतीसाठी पोहचावे लागेल. उमेदवाराने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. लगेचच करा अर्ज ही मोठी संधी नक्कीच आहे.