AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railways Jobs : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! परीक्षा न देताच रेल्वेत मिळवा जॉब, डिटेल्स एका क्लिकवर..

Railways Jobs, Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये 10वी, 12वी आणि पदवीधरांसाठी रिक्त पदांवर भरती सुरू आहे. मुख्य म्हणजे या पदांसाठी लेखी परीक्षेची आवश्यकता नाही.

Railways Jobs : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! परीक्षा न देताच रेल्वेत मिळवा जॉब, डिटेल्स एका क्लिकवर..
job search
| Updated on: Sep 20, 2025 | 1:06 PM
Share

Railways Jobs, Railway Recruitment 2025 : सरकारी नकरी मिळवण्याची इच्छा अनेकांना असते. तुम्हीही सरकारी नोकरीचे स्वप्न पहात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही क्रीडाप्रेमी असाल आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पाहत असाल, तर दक्षिण रेल्वेने तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आणली आहे. रेल्वेने क्रीडा कोट्याअंतर्गत भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज 13 सप्टेंबर 2025 पासून rrcmas.in वर सुरू झाले आहेत. 12 ऑक्टोबर 2025 ही शेवटची तारीख आहे. महत्त्वाचे म्हणजे, या भरतींसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही; त्याऐवजी, केवळ क्रीडा चाचण्या, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीवर निवड आधारित असेल. शिवाय, महिला, अनुसूचित जाती/जमाती आणि काही इतर श्रेणींना शुल्कात सूट मिळेल.

Indian Railways Jobs : कोणत्या खेळांमध्ये संधी ?

ही भरती विशेषतः खेळांमध्ये नावलौकिक मिळवणाऱ्यांसाठी आहे. दक्षिण रेल्वेने ॲथलेटिक्स, बॉडी बिल्डिंग, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोहणे, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग इत्यादी खेळांमधील सहभागींसाठी या रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर यापैकी कोणत्याही खेळात तुमची प्रतिभा दाखवली असेल, तर ही नोकरी तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही राज्य पातळीवर पदक जिंकले असेल किंवा राष्ट्रीय खेळांमध्ये भाग घेतला असेल, तरीही तुम्ही अर्ज करू शकता.

Indian Railways sarkari naukri : शिक्षण आणि वय

या भरतीमध्ये प्रत्येक स्तरासाठी वेगवेगळ्या पात्रता आवश्यक आहेत:

लेव्हल 1: 10 वी उत्तीर्ण किंवा आयटीआय पदवी.

लेव्हल 2/3: 12 वी पास किंवा समतुल्य.

लेव्हल 4/5: ग्रज्युएशन डिग्री

लयाची मर्यादा किती :

कमीत कमी : 18 वर्ष

जास्तीत जास्त : 25 वर्ष

म्हणजे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असाल आणि खेळात उत्तम असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे.

Indian Railways salary : पगार किती मिळणार ?

या पदांसाठी निवड झाल्यास, तुम्हाला दरमहा 18 ते 29 हजार 200 रुपयांपर्यंत पगार मिळेल, तसेच एचआरए, डीए, वैद्यकीय लाभ आणि पेन्शन सारखे अनेक भत्ते मिळतील. तुम्ही लेव्हल 1 किंवा लेव्हल 5 ची सरकारी नोकरी मिळवा,सर्वांसाठी हे सेम असेल.

फी किती ?

रेल्वे, अनुसूचित जाती/जमाती, महिला, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्तींमधील या भरतींसाठी अर्ज शुल्क म्हणून फक्त 250 रुपये द्यावे लागतील. इतर सर्वांसाठी शुल्क 500 रुपये असेल. विशेष म्हणजे जर तुम्ही चाचण्यांमध्ये निवडला गेलात तर अनुसूचित जाती/जमाती, महिला, माजी सैनिक, दिव्यांगांना संपूर्ण 250 रुपये शुल्क परत मिळेल. उर्वरित उमेदवारांना 400 रुपये परत मिळतील.

सिलेक्शन कसं होणार ?

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नाही, जी खूप मोठी दिलासा देणारी आहे. निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे :

क्रीडा चाचण्या : तुम्हाला तुमच्या खेळात कामगिरी करावी लागेल. राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवाची पडताळणी केली जाईल.

कागदपत्रांची पडताळणी : तुमचे प्रमाणपत्रे, पदके आणि शैक्षणिक पात्रता तपासली जाईल.

वैद्यकीय तपासणी : रेल्वे सेवेसाठी शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याने, फिटनेस चाचणी घेतली जाईल.

कसा कराल अर्ज ?

rrcmas.in या दक्षिण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

होमपेज वर Online Registration For Sports Quota For the Year 2025-26 ही लिंक शोधून क्लिक करा.

तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि जन्मतारीख टाकून रजिस्ट्रेशन करा.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेल्या नोंदणी क्रमांकाने लॉगिन करा.

फॉर्ममधील उर्वरित तपशील भरा, विशेषतः तुमच्या क्रीडा कामगिरी, पदके आणि प्रमाणपत्रांची अचूक माहिती नीट भरा..

तुमचा लेटेस्ट फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

तुमच्या कॅटेगरीनुसार शुल्क भरा.

अंतिम फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट काढा.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.