SBI Recruitment 2026 : SBI मध्ये बंपर मेगाभरती; पगार तब्बल १ कोटी, थेट सरकारी नोकरीची संधी, वाचा अर्ज कसा करावा

SBIच्या Wealth Management विभागात Specialist Cadre Officer पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून विविध वरिष्ठ आणि व्यवस्थापकीय पदांचा यात समावेश आहे. पात्रता, अनुभव आणि पदानुसार वयोमर्यादा

SBI Recruitment 2026 : SBI मध्ये बंपर मेगाभरती;  पगार तब्बल १ कोटी, थेट सरकारी नोकरीची संधी, वाचा अर्ज कसा करावा
SBI JOBS
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 5:44 PM

बँकेच्या नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI ने वेल्थ मॅनेजमेंट विभागात Specialist Cadre Officer या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण २०७ पदे भरली जाणार आहेत. या पदांवरील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी लाखोंचे उत्पन्न देण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची मुदत

SBI ने सुरूवातीला ४ सप्टेंबर २०२ रोजी भरतीची घोषणा केली होती. सुरूवातीला अर्ज करण्याती तयारी अंतिम तारीख २५ सप्टेंबर होती. मात्र आता ही मुदत वाढवून ही तारीख ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत बेवसाईटवरून ऑनलाईन अर्ज करू शकता. ही भरती देशभरातली 17 सर्कलमध्ये करण्यात येणार आहे.

कोणकोणत्या पदांसाठी होणार भरती

या भरतीमध्ये एकूण सात प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामध्ये Zonal Head ( Retail ) (1 जागा ), Regional Head (5 जागा ), Realtionship Manager- Team Lead (24 जागा ),
Investment Specialist (9जागा ), Investment Officer, VP Wealth ( 91 जागा ), AVP Wealth ( 73 जागा )समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या भरतीतील प्रत्येक पदासाठी पात्रता आणि कामाचा अनुभव लागणार आहे.Zonal Head ( Retail ) पदासाठी पदवीसोबत Wealth Management किंवा Retail Banaking क्षेत्रातील किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.त्यात टीम लीड करण्याचा अनुभवही अपेक्षित आहे.

वयाची अट काय

पदांनुसाप वयोमर्यादा वेगवेगळी आहे. AVP Wealth पदासाठी वय २३ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तर zonal head आणि regional head यांसारख्या वरिष्ठ पदांसाठी वयोमर्यादा ३५ ते ५० वर्षांपर्यंत आहे.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.

पगार किती मिळणार?

या भरतीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ctc देखील लाखापर्यंत आहे. zonal head पदासाठी वार्षिक ctc 97 लाख रूपयांपर्यंत आहे. Regional Head पदासाठी हे पॅकेज सुमारे 66.40 लाख रुपयांपर्यंत,तर Realtionship Manager- Team Lead पदासाठी 51.80 लाख रूपयांपर्यंत जाऊ शकते .

निवड प्रक्रिया कशी असेल

या पदांसाठी पारंपरिक SBI PO किंवा Clerk सारखी लेखी परीक्षा घेतली जाणार नसून उमेदवारांना शॉर्टलिस्ट केली जाणार आहे. त्यानंतर interview घेतला जाईल आणि आवश्यकतेनुसार ctc negotiation होईल. इंटरव्ह्यू 100 गुणांचा असेल.

अर्ज कसा करावा

इच्छुक उमेदवारांनी SBI च्या अधिकृत करिअर विभागात जाऊन संबंधित भरतीची जाहिरात पाहावी. त्यानंतर ऑनलाईन registration करून फोटो,सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. फॉर्म भरताना अर्ज शुल्क लागू शकतं. 5 ऑक्टोबर 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us