AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर 100 टक्के टॅरिफ लागणार का? अमेरिकेनेच्या नव्या भूमिकेमुळे जग चकित; व्यापाराचं काय होणार?

भारतावर 100 टक्के टॅरिफ कधी लागू केला जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता अमेरिकन अधिकाऱ्याने हा अधिकार मिळाला असला तरी टॅरिफ दुसऱ्याच दिवशी लागू होईल असे नाही, असे स्पष्ट केले.

भारतावर 100 टक्के टॅरिफ लागणार का? अमेरिकेनेच्या नव्या भूमिकेमुळे जग चकित; व्यापाराचं काय होणार?
donald trump and narendra modi tariffsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 26, 2026 | 6:57 PM
Share

Tariff On India  : रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा अधिकार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला आहे. हे अधिकार मिळावेत म्हणून अमेरिकेत एक विशेष कायदा पारित करण्यात आला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांच्याकडे हे अधिकार आल्यानंतर अमेरिकेची भारतावर 100 टक्के टॅरिफ लावण्याची भूमिका समोर आली आहे. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका मोठा ऊर्जा पुरवठादार बनण्याच्या दिशेने प्रयत्न करत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

भारतावर काय परिणाम पडणार?

ट्रम्प यांनी ‘Lindsey O. Graham Sanctioning Russia and Iran Act of 2026’ या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेला रशियन तेल आणि गॅसच्या मोठ्या खरेदीदार देशांवर 100 टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. भारत रशियन कच्च्या तेलाचा मोठा खरेदीदार असल्याने या कायद्याचा भारतावर संभाव्य परिणाम होऊ शकतो. मात्र, 100% टॅरिफ भारतावर आपोआप लागू झालेला नाही.

‘भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका तयार’

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतावर 100 टॅरिफ लावण्याच्या भूमिकेवर भाष्य केलंय. भारताच्या मोठ्या ऊर्जा गरजा लक्षात घेऊन अमेरिका आपल्या हायड्रोकार्बन निर्यातीत वाढ करत आहे. भारत गेल्या काही वर्षांपासून ऊर्जा पुरवठ्याचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावू इच्छित असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण करण्याचा हा प्रयत्न दोन्ही देशांच्या हिताचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे भारताच्या ऊर्जा खरेदीच्या मुद्द्यावर अमेरिकेच्या मनात कोणतीही कटुता नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

100% टॅरिफ लगेच लागू होणार का?

भारतावर 100 टक्के टॅरिफ कधी लागू केला जाणार, असा प्रश्न विचारण्यात आला असता अमेरिकन अधिकाऱ्याने हा अधिकार मिळाला असला तरी टॅरिफ दुसऱ्याच दिवशी लागू होईल असे नाही, असे स्पष्ट केले. रशिया-युक्रेन युद्ध संपवणे हे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. भारतासारख्या अमेरिकेच्या मित्रदेशांनीही या प्रयत्नात सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्या अधिकाऱ्याने यावेळी व्यक्त केली.

भारतासाठी अमेरिकेचा ऊर्जा पर्याय

अमेरिकेच्या अधिकाऱ्याने भारताच्या ऊर्जा बाजारात अमेरिकेची भूमिका वाढवण्याचे संकेत दिले. अमेरिकेचा हायड्रोकार्बन निर्यातीत विस्तार सुरू असून, भारताच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अमेरिकेला मोठा पुरवठादार बनायचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी व्हेनेझुएलातील भारतीय रिफायनरीजचाही उल्लेख करण्यात आला. निकोलस मादुरो यांच्या सरकारच्या काळात व्हेनेझुएलाच्या ऊर्जा उद्योगाचे नुकसान झाल्याने या रिफायनरीज पुन्हा सुरू करणे कठीण असल्याचे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

भारत-अमेरिका ट्रेड डील अंतिम टप्प्यात?

भारत आणि अमेरिकेदरम्यान प्रस्तावित व्यापार कराराबाबतही अमेरिकेच्या अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्यापार करारातील 90 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून काही अंतिम मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!