AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC : एसएससी एमटीएस टियर 1 चा निकाल जाहीर, 44680 विद्यार्थी टियर 2 साठी पात्र

स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC) एसएससी एमटीएस टियर 1 निकाल (SSC MTS tier 1) जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जारी करण्यात आला आहे.

SSC : एसएससी एमटीएस टियर 1 चा निकाल जाहीर, 44680 विद्यार्थी टियर 2 साठी पात्र
स्टाफ सिलेक्शन कमिशनImage Credit source: SSC Website
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 05, 2022 | 2:35 PM
Share

SSC MTS tier 1 Result 2020 नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं (SSC) एसएससी एमटीएस टियर 1 निकाल (SSC MTS tier 1) जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जारी करण्यात आला आहे. एसएससी एमटीएस टियर 1 परिक्षेत 44680 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. टियर 1 परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार त्यांच्या निकाल तपास शकतात. एसएससीची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in या वेबसाईटवर निकाल पाहता येईल. एसएससी एमटीएस चा निकाल पीडीएफमध्ये जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थी त्यामध्ये त्यांचा निकाल पाहू शकतात. स्टाफ सिलेक्शन कमिशननं यशस्वी विद्यार्थ्यांना टियर 2 च्या परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. टियर 1 च्या पेपरमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल 14 मार्च रोजी पाहता येतील. टियर 2 च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी स्टाफ सिलेक्शनं कट ऑफ देखील जारी केली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशननं विद्यार्थ्यांना निकाल 14 मार्च रोजी उपलब्ध होतील, असं सांगितलं आहे.

अंतिम उत्तर तालिका 14 मार्चला उपलब्ध होणार

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून एसएससी एमटीएस 2021 ची अंतिम उत्तर तालिका 14 मार्चला जाहीर केली जाईल. एसएससी एमटटीएस 202 टियर 1 मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना टियर 2 च्या परीक्षेत सहभागी व्हावं लागेल. एसएससी एमटीएस टियर 2 परीक्षा ही दिर्घोत्तरी स्वरुपाची असेल.

निकाल कसा पाहायचा?

स्टेप 1 : स्टाफ सिलेक्शन कमिशनची वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या. स्टेप 2 : होमपेजवरील Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2020 वर क्लिक करा. स्टेप 3 : SSC MTS 2020-21च्या निकालाची पीडीएफ फाईल असेल, त्यावर क्लिक करा स्टेप 4 : यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पीडीएफममध्ये तुमचा परीक्षा क्रमांक सर्च करा स्टेप 5 : परीक्षेच्या पुढील टप्प्यावरील उपयोगासाठी पीडीएफ सेव्ह करुन ठेवा.

टियर 2 मधील पेपरचं स्वरुप?

एसएससी एमटीएस परीक्षा पॅटर्ननुसार भारतीय संविधानाच्या 8 व्या अनूसूचीनुसार विद्यार्थ्यांना इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत निबंध लिहावा लागेल. पेपर क्रमांक 2 साठी 50 गुण निश्चित करण्यात आले आहेत. SSC MTS परीक्षा केंद्र सरकारच्या विविध विभागात मल्टी टास्किंग स्टाफच्या नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आली आहे. एसएससीद्वारे जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एमटीएस परीक्षा 2020 पेपर क्रमांक दोन संदर्भातील माहितीपत्रक वेबसाईटवर जारी करण्यात येईल. टियर 2 परीक्षेच्या तारखा सात दिवस अगोदर जाहीर केल्या जातील. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र एसएससीच्या प्रादेशिक विभागाच्या वेबसाईटवर जारी करण्यात येतील, काही अडचणी आल्यास विद्यार्थी प्रादेशिक कार्यालयात भेट देऊ शकतात.

इतर बातम्या:

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?