Breaking : टाटा पॉवर प्रकल्पाच्या कार्यकारी संचालकासह 6 जणांना अटक! सीबीआयची मोठी कारवाई

| Updated on: Jul 07, 2022 | 4:20 PM

नवी दिल्ली : टाटा पॉवर प्रकल्पाच्या 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. त्यामध्ये एका कार्यकारी संचालकाचा समावेश आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ही अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही धारेदोरे सापडतात का, याची शोधमोहीम दिल्ली, गुरगाव, नोएडा आणि गाझियाबाद येथे सुरू आहे.

Breaking : टाटा पॉवर प्रकल्पाच्या कार्यकारी संचालकासह 6 जणांना अटक! सीबीआयची मोठी कारवाई
Follow us on

नवी दिल्ली : टाटा पॉवर प्रकल्पाच्या (Tata Power project) 6 वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक केली. त्यामध्ये एका कार्यकारी संचालकाचा (executive director)समावेश आहे. लाच प्रकरणात ही अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी काही धारेदोरे सापडतात का, याची शोधमोहीम दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबाद येथे सुरू आहे. या अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक केल्याचं सीबीआयनं स्पष्ट केलंय. नार्थ ईस्टर्न रिजनल पॉवर सिस्टीम इम्प्रुव्हमेंट प्रकल्पात लाच घेतल्यानं ही कारवाई करण्यात आली. देशभरातील 11 ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे.

93 लाख रुपये नगदी मिळाले

प्राप्त माहितीनुसार, टाटा पॉवर प्रोजेक्सचे 6 वरिष्ठ अधिकारी आणि पॉवर ग्रीड कार्पोरेशनचे कार्यकारी संचालक बी. एस. झा ला लाच प्रकरणात अटक करण्यात आली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, पॉवर ग्रीड लाच प्रकरणात टाटा पॉवरचे कार्यकारी उपाध्यक्ष देशराज पाठक आणि सहाय्यक उपाध्यक्ष आर. एन. सिंहसह पाच कार्यकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. बी. एस. झा ईटनगर येथे कार्यरत आहेत. या पाच अधिकाऱ्यांना पंचकुला येथील न्यायालयात हजर केले जाईल. सीबीआयनं खासगी कंपनीला फायदा पोहचविण्यासाठी लाच प्रकरणात बुधवारी गाझीयाबाद, नोएडा, गुरुग्रामसह अन्य ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे. या दरम्यान, झाच्या गुरुग्राम परिसरात 93 लाख रुपये नगदी मिळाल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण

टाटा पॉवर प्रोजेक्ट ही मोठी कंपनी आहे. खासगी कंपनीला फायदा होईल, अशाप्रकारचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. यात कार्यकारी संचालक बी. एस. झासुद्धा सामील झाले होते. शिवाय पाच इतर अधिकाऱ्यांनी खासगी कंपनीच्या फायद्याचा निर्णय घेतला. याची माहिती सीबीआयला मिळाली. यावरून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. पाच अधिकाऱ्यांना पंचकुला येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुरुग्राम परिसरात 93 लाख रुपये नगदी मिळाले. याशिवाय शोधमोहीम सुरू आहे. यात आणखी बरचकाही मिळण्याची शक्यता आहे. याचा तपास सीबीआय करत आहे.