बारामतीत वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, तरुणीची सुटका

| Updated on: Nov 26, 2021 | 6:39 PM

सुटका करण्यात आलेली तरुणी मूळची माळशिरस येथील असून , सध्या रुई येथे वास्तव्यास होती. या प्रकरणी पोलिसांनी रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.

बारामतीत वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई ; दलाल महिलेला अटक, तरुणीची सुटका
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

बारामती – शहरात गुन्हेगारीचे सत्र वाढत सातत्याने वाढत आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात पोलिसांनी वेश्या व्यवसायावर कारवाई करत दलाल महिलेस अटक व  एका महिलेची सुटका केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयासमोरील चिमनशहा मळा परिसरात दोन महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत दलाल महिला अटक केली.

वेश्या व्यवसायाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून शहानिशा करण्याचे आदेश त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले. दोन पंचांना सोबत घेत व एक बोगस ग्राहक तयार करत त्याच्याकडे पैसे देण्यात आले. त्याने दलाल महिलेला भेटल्यानंतर तिने एक महिला दाखवली. दीड हजार रुपये स्विकारत त्या महिलेसोबत बोगस ग्राहक गेल्यानंतर त्याने पोलिस निरीक्षक महाडीक यांना मोबाईलवर मिस्ड कॉल देत इशारा केला. तर दुसरीकडे साध्या वेषात थांबलेल्या पोलिस पथकाने तेथील एका लॉजवर छापा टाकत दोघा महिलांना ताब्यात घेतले.

सुटका करण्यात आलेली तरुणी मूळची माळशिरस येथील असून , सध्या रुई येथे वास्तव्यास होती. या प्रकरणी पोलिसांनी रुई परिसरातील बयाजीनगर येथे राहणाऱ्या दलाल महिलेवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली आहे.

नाहीतर लॉजवरही होईल कारवाई
ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे यांच्यासह पोलिस कर्मचारी पवार, राऊत, हिंगणे, लाळगे आदीं सहभागी झाले होते. शहरातील लॉज मालकांनी अश्या प्रकारच्या वेश्या व्यवसायांना थारा देवू नये. तसेच लॉजवर येणारे लोक यांची व्यवस्थित खातर जमा करावी असेही त्यांनी सांगितले आहे. कोणत्याही लॉजवर असाप्रकार आढळून आल्यावर त्याच्या कडक कारवाई केली जाईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

सलग दुसऱ्या आठवड्यात कारवाई
पोलीसांनी मागील आठवड्यात केलेल्या कारवाईमध्ये वेश्या व्यवसाय करत असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात शहरातील वेश्या व्यवसाय उघड करण्यात पोलीसांना यश आले आहे.

Varsha Gaikwad| नागरिक शास्त्राच्या पुस्तकात संविधानाचा अभ्यास वाढवणार, वर्षा गायकवाड यांची माहिती

Arjun Khokar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा

Arjun Khokar | शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीचा छापा