AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेअरकट करायला दुपारी बाहेर पडला, रात्री रस्त्यात मृतदेह आढळला, अकोल्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील फडके हॉस्पिटलच्या गल्लीत रात्रीच्या सुमारास एक युवक पडलेला असल्याचे काही जणांना दिसले (Akola Youth found Dead Murder)

हेअरकट करायला दुपारी बाहेर पडला, रात्री रस्त्यात मृतदेह आढळला, अकोल्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू
अकोल्यात तरुण रात्री मृतावस्थेत आढळला
| Updated on: Apr 04, 2021 | 7:34 AM
Share

अकोला : अकोला शहरात 30 ते 35 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या जठारपेठ भागातील फडके हॉस्पिटलच्या गल्लीत हा युवक मृतावस्थेत सापडला. युवकाची हत्या झाली की अपघात झाला, याची चर्चा गावात सुरु आहे. (Akola Crime Youth found Dead went for haircut Murder suspected)

तीन तासांनंतरही पोलीस घटनास्थळी नाहीत

अकोला शहरातल्या रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील फडके हॉस्पिटलच्या गल्लीत रात्रीच्या सुमारास एक युवक पडलेला असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. पण तीन तास होऊनही याठिकाणी पोलीस पोहचले नाहीत. त्यामुळे मृतदेह त्याच ठिकाणी पडून होता.

मृतदेहाजवळ बघ्यांची गर्दी

तीन तासानंतर रामदासपेठ पोलीस त्या ठिकाणी पोहचले. मृतदेह सापडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांनी एकच गर्दी केली होती. या युवकाची ओळख पटली असून त्याच भागात अन्नपूर्णा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सौरभ सुळे याचा हा मृतदेह असल्याचं समोर आलं आहे.

हेअरकटसाठी बाहेर, घरी परतलाच नाही

सौरभ दुपारीच हेअरकट करण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो रात्री उशिरापर्यंत घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह आढळून आल्याने त्याची हत्या झाली, त्याचा अपघात झाला की त्याने आत्महत्या केली, हे पोलीस तपासानंतरच उघड होईल.

होळीच्या रात्री महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह

नालासोपारा पूर्व भागात महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह बॅगेत भरुन फेकण्यात आला होता. ऐन होळीच्या रात्री एका काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. गेल्या रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह नालासोपारा पूर्व भागात आढळला. श्रीरामनगर परिसरात मुख्य रस्त्याजवळ एका काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह होता.

संबंधित बातम्या :

हातात एअरगन, वॉकी-टॉकी, मुंबईला फुकट जायचं म्हणून ट्रव्हल्सवाल्यांशी हुज्जत, वर्दीतल्या खोट्या आयपीएसचा पर्दाफाश

सोलापुरात अंगावरची हळद उतरण्यापूर्वीच रक्त सांडलं, लग्नाच्या दोन महिन्यातच पत्नीला संपवलं!

(Akola Crime Youth found Dead went for haircut Murder suspected)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.