आर्थिक वाद टोकाला, नालासोपाऱ्यात चाकू भोसकून पत्नीची हत्या

नालासोपाऱ्यात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Husband murders Wife).

  • विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, नालासोपारा
  • Published On - 10:10 AM, 4 Mar 2021
आर्थिक वाद टोकाला, नालासोपाऱ्यात चाकू भोसकून पत्नीची हत्या
प्रतिकात्मक फोटो

नालासोपारा : नालासोपाऱ्यात पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे (Husband murders Wife). पतीने चाकू भोकसून पत्नीची निर्घृण हत्या केलीये. पैशांच्या आर्थिक वादातून ही पत्नीची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे (Maharashtra Crime News Nalasopara Crime Husband murders Wife).

राहत्या घरात पत्नीची हत्या करुन पतीचा पोबारा

विनिता मोरे, असे हत्या झालेल्या पत्नीचे आहे. तर रुपेश मोरे असे आरोपी पतीचे नाव आहे. नालासोपारा पूर्व शिर्डी नगर परिसरात ही घटना घडली. येथे राहत्या घरात रुपेशने विनिताची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पोबारा केला. सध्या तो फरार आहे.

या घटनेची माहिती मिळताच तुळिंज पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तुळिंज पोलिसांच्या 2 तुकड्या हत्या करणाऱ्या पतीचा कसून शोध घेत आहे (Husband murders Wife).

मार्च महिन्यात तीन दिवसात तीन हत्येच्या घटना

नालासोपाऱ्यात मार्च महिन्याच्या सुरवातीच्या तीन दिवसात घडलेल्या या तिसऱ्या हत्येच्या घटनेने नालासोपारा परिसरात एकच खळबळ माजली आहे.

1 मार्चला कैलास पाठकची अज्ञानांकडून हत्या

मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला कामावर जाणाऱ्या व्यक्तीची काही अज्ञातांनी हत्या केली होती. कैलास पाठक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कैलास पाठक 1 मार्चला सकाळी साडे चार वाजता मुंबईला कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, घरापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. मृत कैलास पाठक हा पार्ले येथे सुरक्षारक्षकाच काम करायचा. तो नालासोपाऱ्यात आपल्या घरी आठवड्यातून एकदा यायचा.

1 मार्चला दुपारी रिक्षा चालकाची हत्या

नालासोपाऱ्यात 1 मार्चला दुपारी साडे चार वाजताच्या सुमारास किसन सच्छिदानंद शुक्ला (वय 29) नावाच्या रिक्षा चालकाची अज्ञातांकडून हत्या करण्यात आली होती. गौराईपाडा शितला मंदिराजवळ काही अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत किसन शुक्ला यांची हत्या केली. हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे.

Maharashtra Crime News Nalasopara Crime Husband murders Wife

संबंधित बातम्या :

वसई-विरार-नालासोपारा, ठाणे, मुंबईतील वाहन चोरणारी टोळी गजाआड, 13 लाखांच्या गाड्या जप्त

गँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार