नालासोपाऱ्यात पहाटे कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून, लुटीचा संशय

नालासोपाऱ्यात आज पहाटे कामावर जाणाऱ्या एका व्यक्तीची (Nalasopara Man Murder By Unknown) हत्या करण्यात आली आहे.

नालासोपाऱ्यात पहाटे कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा निर्घृण खून, लुटीचा संशय
प्रतिकात्मक फोटो

नालासोपारा : नालासोपाऱ्यात आज पहाटे कामावर जाणाऱ्या एका व्यक्तीची (Nalasopara Man Murder By Unknown) हत्या करण्यात आली आहे. धारदार हत्याराने वार करुन त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे (Nalasopara Man Murder By Unknown).

कैलास पाठक असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कैलास पाठक आज (1 मार्च) सकाळी साडे चार वाजता मुंबईला कामावर जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, घरापासून काही अंतरावर अज्ञात व्यक्तींनी चाकूने वार करुन त्याची निर्घृण हत्या केली आहे.

मृत कैलास पाठक हा पार्ले येथे सुरक्षारक्षकाच काम करायचा. तो नालासोपाऱ्यात आपल्या घरी आठवड्यातून एकदा यायचा. त्याचे कुणाबरोबरही वैर नसल्याचं त्याची वहिनी कीनू पाठक यांनी सांगितलं आहे.

मात्र, पहाटे साडे चार-पाचच्या दरम्यान त्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणालाही कळालं नाही. मात्र, सकाळी सात वाजता आजू बाजूच्यांनी घरच्यांना या घटनेबाबत कळवलं.

पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही हत्या लुटीच्या उद्देशातून झाली की, दुसऱ्या कुठल्या कारणावरुन झाला याचा पेलीस शोध घेत आहेत.

Nalasopara Man Murder By Unknown

संबंधित बातम्या :

Uttar Pradesh | उन्नावनंतर आता अलिगढमध्ये जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करुन हत्या केल्याचा संशय

Video : गतिमंद मुलीने दुसऱ्या गतिमंद मुलीला दुस-या मजल्यावरुन फेकलं, कोथरुडमधील धक्कादायक प्रकाराचा CCTV

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI