Video : गतिमंद मुलीने दुसऱ्या गतिमंद मुलीला दुस-या मजल्यावरुन फेकलं, कोथरुडमधील धक्कादायक प्रकाराचा CCTV

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणात एका 14 वर्षीय गतिमंद मुलीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : गतिमंद मुलीने दुसऱ्या गतिमंद मुलीला दुस-या मजल्यावरुन फेकलं, कोथरुडमधील धक्कादायक प्रकाराचा CCTV
Crime
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 8:26 PM

पुणे : एका गतिमंद मुलीने दुसऱ्या गतिमंद मुलीला दुसऱ्या मजल्यावरुन फेकल्याचा धक्कादायक प्रकार कोथरुडमध्ये घडलाय. कोथरुड परिसरातील डावी भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद आणि बहुविकलांग प्रतिष्ठाणमध्ये ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ममता मोहन डोंगरे असं मृत मुलीचं नाव आहे. या प्रकरणात एका 14 वर्षीय गतिमंद मुलीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(A mentally retarded girl throws another mentally retarded girl down from the second floor)

कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनी इथं रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत ममता डोंगरे ही संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवरून चालत असताना संस्थेतच राहणारी 14 वर्षीय मतिमंद मुलगी त्या ठीकाणी आली. तिने ममता डोंगरे हिला पाठीमागून पकडले आणि उचलून दुसऱ्या मजल्यावरील जिन्यातून खाली फेकून दिले. त्यामुळे दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे आमचा डोंगरेचा मृत्यू झालाय. या प्रकरणात अनिता रामकिसन टापरे यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेत, पुढील तपास सुरु केला आहे.

अनाथाश्रम चालकाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

नांदेडमधील एका अनाथ आश्रमात अल्पवयीन मुलीवर संस्थाचालकानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुदखेडच्या अनाथ आश्रम चालकानेच हा अत्याचार केल्याची माहिती आहे. या आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल असून तो सध्या फरार आहे. पोलीस आरोपी शिवाजी गुट्टे याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नांदेडमधील मुदखेड येथे एक अनाथाश्रम आहे. या अनाथाश्रमात अनेक मुली आहेत. आश्रमाचा संस्थाचालक शिवाजी गुटठे याने तक्रारदार मुलीवर लैंगिक अत्याचार केले. तसा आरोप तक्रारदार मुलीने केला आहे. तक्रारदार मुलीने आरोपीच्या अत्याचारांना कंटाळून अखेर आपल्या एका मैत्रीणीसोबत अनाथाश्रमातून पळ काढला. त्यानंतर पीडित मुलीने मुदखेडहून रेल्वेप्रवास करत थेट किनवट शहर गाठले. यानंतर अनाथाश्रमामधून मुली गायब असल्यामुळे खळबळ उडाली.

आरोपी फरार

दरम्यान, हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या मुलींची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपी शिवाजी गुटठे याला शोधण्याची मोहीमही सुरु केली आहे. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

इतर बातम्या :

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त

A mentally retarded girl throws another mentally retarded girl down from the second floor

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.