पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

सुदर्शन पंडित हा तरुण पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता (Pune PhD Student Murder)

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं
Crime
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 8:42 AM

पुणे : पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रुप करण्यात आला. 30 वर्षीय तरुणाच्या हत्येमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. (Pune PhD Student Sudarshan Pandit Murder)

जालन्याच्या विद्यार्थ्याचे पुण्यात पीएचडी शिक्षण

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित या तरुणाची हत्या करण्यात आली. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात सुदर्शन पंडित राहत होता. तो मूळ जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळचा (पंडित) रहिवासी होता.

धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं

धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन सुदर्शनची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला.

सुदर्शनच्या हत्येबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Pune PhD Student Sudarshan Pandit Murder)

कल्याणच्या सापर्डे हत्याकांडात नवा ट्विस्ट

कल्याणच्या सापर्डे गावातील हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आरोपीने सुरुवातीला प्रेम संबंधातून महिलेची हत्या केली, असा दावा केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात वेगळी माहिती समोर आली आहे. आरोपी पवन म्हात्रेने महिलेच्या गळ्यातील 20 तोळे सोने लुटण्यासाठी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर महिलेची हत्या करत असताना आरोपीच्या आईने बघितले म्हणून त्याने स्वत:च्या आईवरही गोळी झाडली. आरोपी पवन म्हात्रेच्या या खुलाश्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत.

संबंधित बातम्या :

कल्याणच्या सापर्डे हत्या प्रकरणाला वेगळं वळण, 20 तोळे सोन्यासाठी महिलेची हत्या, सख्ख्या आईवर गोळी झाडली

दोन लहान मुलं, तरीही पत्नीवर अनैतिक संबंधांचा संशय, पतीचं क्रूर कृत्य, घरदार उद्ध्वस्त

गोरेगावातील तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा, चौघे अटकेत

(Pune PhD Student Sudarshan Pandit Murder)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.