गोरेगावातील तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा, चौघे अटकेत

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.  (Mumbai transgender Murder)

गोरेगावातील तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा, चौघे अटकेत
तृतीयपंथीय हत्याकांडाचा अखेर उलगडा
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 6:46 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील गोरेगाव भागात एका तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. या हत्याकांडातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस झोन अकराचे डीसीपी विशाल ठाकूर यांनी ही कारवाई केली आहे. (Mumbai transgender Murder Police Arrest four People)

नेमकं प्रकरण काय? 

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील बांगुर नगर विभागात राहणाऱ्या सूर्या या तृतीयपंथीयाची 24 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास या तृतीयपंथीयाचा खून करण्यात आला होता. या तृतीयपंथीयांना मारण्यासाठी हातोडी तसेच अन्य धारदार हत्यारांचा वापर करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी मृत व्यक्तीला ओळखणारे आहेत. तसेच हे आरोपी आजूबाजूच्या विभागात राहत होते. या आरोपींचे मृत व्यक्तीसोबत छोट्याछोट्या कारणांवरुन सतत वाद व्हायचे. याच कारणाने त्या तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांना आहे.

विशेष म्हणजे याआधीही आरोपींनी दोन तीन वेळा तृतीयपंथीयाची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बुधवारी 24 फेब्रुवारीला सूर्याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. सूर्या हा तृतीया पंथाचा गुरु होता. अनेक व्यक्तींना तो मदतही करत होता.

चार जणांना अटक 

या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. धीरज राम भूषक विश्वकर्मा (20), विनायक राजाराम यादव (22) आणि राजेश राजकुमार यादव (23) अशी तिघांची नावे आहेत. तसेच यात एका 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. (Mumbai transgender Murder Police Arrest four People)

संबंधित बातम्या : 

हिंमत असेल तर अमेय खोपकरला अटक करून दाखवा; मनसे आक्रमक

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.